सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चुकीचे होत असलेल्या विस्तारीकरणास परवानगी देवु नये म्हणुन मी मा.साखर आयुक्त व अजित पवार यांना लेखी निवेदन दिले आहे. विस्तारीकरणास माझा व कृती समितीचा काल, आज व भविष्यातही विरोध नव्हता व असणार नाही. परंतु चुकीच्या व दिशाभुल करणाऱ्या विस्तारीकरणास आमचा विरोध आहे. मागील काही महिन्यांपुर्वी चेअरमन यांनी विस्तारवाढ करण्याचा केविलवाना प्रयत्न केला होता. परंतु कृती समितीची बाजु अजितदादा यांनी समजुन घेतल्याने विस्तारीकरण स्थगित झाले होते.
परंतु स्व हीत साधण्यासाठी पुन्हा विस्तारीकरण करण्याची चेअरमन घाई का करीत आहेत? का नविन संचालक मंडळामध्ये निर्णय घेण्याची क्षमता नाही का? केवळ कार्यक्षेत्रात जादा उस आहे, याचा भाऊ केला आहे. त्यासाठी फक्त विस्तारीकरण हा केवळ एकच पर्याय आहे का? जादा उस उपलब्ध अनेक वेळा झाला आहे. मागे दोन वेळा आपल्या कारखान्याची रिकव्हरी जादा असतानाही तोटा खावुन बाहेरील कारखान्यांना याच चेअरमन यांनी उस दिला होताच की निदान चालु वर्षी तरी किमान तोटा न खाता बाहेरील कारखान्यांना उस द्यावा. तसेच नविन संचालक मंडळ येईल त्यावेळी विस्तारीकरण करण्याचा निर्णय घेता येईल. आत्ता जरी विस्तारीकरणाचा निर्णय घेतला तरी त्याचा उपयोग चालु वर्षी होणार नाही मग घाई कशासाठी? पण चुकीचे विस्तारीकरण करून कारखाना भविष्यात
तोट्यात घालुन चेअरमन यांना काय मिळवायचे आहे का? चेअरमन यांनी काही दिवसांपुर्वी वर्तमान पत्रामधुन काही मुद्दे मांडले होते त्याचा खुलासा करणे गरजेचे वाटते. भांडवली खर्च किती करावयाचा यासाठी वार्षिक सभेत अंदाजपत्रक ठेवावे लागते, कामांसाठी लागणारे पैसे कोठुन उपलब्ध होणार याची माहिती सादर करावी लागते. परंतु चेअरमन यांनी हे सगळे नियम धाब्यावर बसवुन जास्तीत जास्त कामे गरज नसताना केली आहेत व करीत आहेत. कारखान्याचे सगळे भांडवल दगडी बांधकामे, मशिनरी खरेदी यात खर्च करून चेअरमन यांनी त्यांचा कार्यकाळ सार्थकी लावला आहे. इमारती बांधकाम करण्यासाठी ७ कोटी ५० लाख रूपयांचे कर्ज कोणी काढले याचा खुलासा का केला
नाही? आत्मनिर्भर भारत योजनेतुन १२ कोटी रूपये कर्ज कोणत्या कारणासाठी काढले याचा खुलासा का केला नाही?
पुर्व हंगामी कामासाठी २५ कोटी रूपये कर्ज का काढले? तसेच अजुन नियोजीत ७२ कोटी रूपयांची विस्तारवाढ पुर्ण करून विश्रांती घेण्याच्या तयारीत दिसतात. परंतु चेअरमन यांनी त्यांच्या कार्यकाळात सुमारे ५० ते ६० कोटी रूपयांची भांडवली कामे करून अजुन १०० कोटी रूपये कर्ज काढुन भांडवली खर्च करणे कितपत योग्य आहे. याचा विचार केला पहिजे की नाही? हे सभासदांनी समजुन घ्यावे.कृती समितीच्या म्हणण्या प्रमाणे सन २०१९-२० चा अंतिम उस दर व्यवहाराने ४००/- रू. प्रती मे.टन
जादा निघत होता. परंतु चेअरमन यांनी जुलै २०२० मध्येच साखर आयुक्त यांना ३०००/- रू. प्रति मे.टन भाव बसत आहे असे कळविले होते. (त्याचा पुरावा सुध्दा माझ्याकडे आहे ) कारण चेअरमन यांना उर्वरित अंदाजे ४० कोटी रूपये रक्कम त्यांचा कार्यकाळ सपण्या आगोदर नियोजीत विस्तारवादीच्या कामांची बिले व अॅडव्हान्स देण्यासाठी वापरायचे असल्याने ठेवलेले आहेत. तसेच कामगारांनी मागील पाच ते सात वर्षात कारखाना खऱ्या अर्थाने प्रगती पथावर आणला त्याच कामगारांना..... मातीत गाडण्याचे काम चेअरमन .....
यांनी केलेले आहे. कारण साखरवाडी सारखा कारखाना कर्ज बाजारी होवुन बंद झाला होता तरी ही व्यवस्थापकांनी त्यावेळी कामगारांना १९ टक्के बोनस देवुन कारखाना चालु केला. परंतु चेअरमन यांच्या म्हणण्याप्रमाणे एक नंबर असलेल्या आपल्या कारखान्याने कामगारांना मात्र १५ टक्केच बोनस देवुन त्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.
कोणताही साखर कारखाना त्याच्या गाळप क्षमतेपेक्षा विस्तारवाढ करीत असताना १८ ते २२ टक्के अधिक
क्षमतेने गाळप होईल अशा पध्दतीने विस्तारवाड करीत असतो.
सोमेश्वरची गाळप क्षमता १०१६ प्रती मे.टन असताना १३५० प्रती मे.टन दैनंदिन गाळप करीत होता.
तसेच नंतर गाळप क्षमता २५०० प्रती मे.टन असताना ३२०० प्रती मे. टन दैनंदिन गाळप करीत आलेला आहे.
तसेच गेल्या तीन वर्षाची कारखान्याच्या गाळप क्षमतेची सरासरी पाहिली तर
५३०० मे.टन ते ५४०० मे.टनानेच कारखान्याने गाळप केले आहे याचे चेअरमन यांनी आत्मपरिक्षण करावे.
त्यामुळे चेअरमन यांनी कोणते भांडवली खर्च करून गाळप वाढविले हा संशोधनाचा विषय आहे. त्यासंबंधी मा.साखर आयुक्तसाो. यांची कारखान्याने केलेल्या भांडवली खर्चाची चौकशी सुरू आहे. महत्वाच्या विषयांना बगल देवुन केवळ कृती समितीला बदनाम करायचे. कृती समितीने मागील ५ गाळप हंगामात काय अडचणी आणल्या हे चेअरमन यांनी स्पष्ट करावे. तसेच ...पवार - काकडे... मनोमिलन झाल्याने आपले दुकान बंद होणार असल्याने यामध्ये व्यत्यय आणायचे काम कोण करीत आहे हे सभासद जाणत आहेत.
चेअरमन म्हणतात FRP रक्कम दिली मग चेअरमन यांनी सभासदांना FRP रक्कम दिली म्हणजे उपकार
करीत नाही?
सभासदांना FRP पेक्षा २००/- रू. जादा दिले असे सांगुन दिशाभुल करीत आहेत.
वास्तविक चेअरमन जरी राज्याची भाषा करीत असले तरी त्यांनी जिल्ह्यातीलच भिमाशंकर कारखान्याचा आदर्श घ्यावा. कारण भिमाशंकर कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता ४५०० प्रती मे.टन असताना, रिकव्हरी सोमेश्वर कारखान्यापेक्षा कमी ११.५५ असताना, तसेच त्या कारखान्याकडे डिस्टीलरी प्रकल्प नसताना, आपल्या पेक्षा ३ मेगावॅट को-जन प्रकल्प कमी असताना, बायोगॅस प्रकल्प नसताना डिस्टीलरीचे व को-जन चे अंदाजे ८ ते ९ कोटी रूपये उत्पन्न आपल्या कारखान्यापेक्षा कमी असताना त्यांनी २६९०/- रू. प्रती मे.टन FRP देवुन दिपावलीला परत १५०/- रू. प्रती मे. टन सभासदांना दिले तसेच ८६०३२ या उसाला १२५/- रू. प्रती मे.टन व खोडवा उसास १००/- रू, प्रती मे.टन अनुदान दिले त्या सभासदांना २९६५/- रू. प्रती मे.टन दर मिळाला आहे. यावरून चेअरमन यांनी जादा भाव दिला आहे.
अशी दिशाभुल करू नये. FRP देण्यासाठी कारखान्यांना ज्या वर्षी अडचणी येतात त्यावेळी केंद्र सरकार व राज्य सरकार बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देत असतेच तसेच केंद्र सरकारने साखरेला ३१००/- रू. प्रती क्विंटल हमीभाव दिला आहे त्यामुळे कारखान्यांना FRP देण्यासाठी अडचण येण्याचे कारणच नाही. तसेच कारखान्याने सभासदांच्या उस बीलातुन कपात करून ठेवलेला किंमत चढउतार निधी २० कोटी रूपये हा FRP साठी ठेवला असल्याचे वर्तमान पत्रातील चेअरमन यांचे वक्तव्य हस्यास्पद आहे. सभासदांच्या उस दरासाठी सदर उस रक्कम वापरायला काही हरकत नसताना चेअरमन यांनी भांडवली खर्चामध्ये ही रक्कम समाविष्ट केलेली आहे. सभासदांवर जर ऐवढेच प्रेम असते तर ती रक्कम स्वतंत्र खात्यात गुंतवुण ठेवली असती. तरी कारखान्याचे चेअरमन यांनी सभासदांची दिशाभुल न करता विस्तारीकरणावर व सभासदांना भाव कसा देता येतो यावर शेतकरी कृती समितीशी समोरासमोर चर्चा करावी. तरी चेअरमन यांनी यापुढे कधी ही कारखान्या विषयी बोलावयाचे झाल्यास त्या खुर्चीची अब्रु राखुन बोलावे. तसेच विस्तारीकरणा विषयी कृती समितीने जे मुद्दे मांडले आहेत ते खरे किंवा खोटे असल्यास
त्यावर बोलावे. कृती समितीचे म्हणणे खोटे असल्यास सभासदांची मिटींग बोलवावी म्हणजे विस्तारीकरण, कर्ज काढले आहे की नाही अशा सर्वच यावी बद्दल चर्चा करता येईल म्हणजे दुध का दुध व पाणी का पाणी होईल,
......
काजु खाऊ संचालक मंडळाचा जाहिर निषेध...
कारखान्याच्या चेअरमन व संचालक मंडळाने कोरोना महामारीच्या काळात सभादांच्या घामाच्या पैशातुन लाखो
रूपयांचे ड्रायफुट्स (काजु, बदाम, पिस्ता, अंजिर, खारीक, मनुके, आकोड, केशर इत्यादी) फस्त केलेले आहेत. (याचा पुरवा माझ्याकडे आहे) असे जर घडत असेल तर सभासदांना कसा भाव मिळेल याचा सभासदांनी विचारकरून संचालक मंडळाला हे खरे का खोटे याचा जाब विचारावा.