इंदापूर तालुका प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले
शहाजीनगर (ता.इंदापूर) येथे निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या पेट्रोल पंपाचा शुभारंभ माजी सहकार मंत्री व कारखान्याचे संस्थापक मा.हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या हस्ते शनिवारी (दि.12) करण्यात आला.
सद्या कारखान्याचा डिझेलचा पंप आहे. आता पेट्रोल पंप सुरु करण्यात आल्याने शेतकरी व कर्मचाऱ्यांची चांगली सोय होणार आहे. *कारखान्याने आजअखेर 234703 मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले आहे.आसवणी प्रकल्पातून इथेनॉलचे 1287543 लि. व अल्कोहोलचे 2243715 लि.चे उत्पादन घेतले आहे. तसेच आजअखेर सह-वीजनिर्मिती प्रकल्पामधून 10600801 युनिट वीज विक्री करण्यात आली आहे. कारखान्याचा गळीत हंगाम उत्कृष्टपणे चालू असल्याची माहिती मा. हर्षवर्धन पाटील साहेब यांनी दिली. यावेळी संचालक मंडळ, अधिकारी वर्ग उपस्थित होते.