Type Here to Get Search Results !

डोर्लेवाडीत महारक्तदान शिबिरात विक्रमी ८०१ बाटल्या रक्त संकलन .....

पोलीस अधिकारी यांनीही केले रक्तदान          

डोर्लेवाडी प्रतिनिधी
 
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त  डोर्लेवाडी(ता.) बारामती येथे आयोजित केलेल्या महारक्तदान  शिबिरास नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.शिबिरात  विक्रमी ८०१ बाटल्यांचे संकलन करण्यात आले.  राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार अक्षय ब्लड बँक पुणे, डोर्लेवाडी ग्रामस्थ व सार्वजनिक २० तरुण मंडळांच्या वतीने   महारक्तदान शिबिराचे आयोजन आज (ता.११) रोजी करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक संतोष झगडे यांच्या हस्ते झाले.यावेळी बारामतीचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे,  उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, पुण्याचे उद्योजक दशरथ जाधव, विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुजर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर, तहसीलदार विजय पाटील, माढाचे तहसीलदार राजेश चव्हाण,  जिल्हा परिषद सदस्या मीनाक्षी तावरे, पंचायत समिती सदस्य राहुल झारगड, बारामती शहर पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, बारामती ग्रामीण पोलिस स्टेशन निरीक्षक महेश चव्हाण, सरपंच बाळासाहेब सरवदे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळपासूनच नागरीकांचा या रक्तदान शिबिरास मोठ्या प्रमाणात उत्साह होता. दुपारपर्यंत डोर्लेवाडीसह  परिसरातील बारामती, सोनगाव, काटेवाडी, पिंपळी, झारगडवाडी,गुणवडी येथील तरुणांनी रक्तदान करण्यासाठी रांगा लावल्या  होत्या. सायंकाळी सहा वाजेपर्यंत ८०१ बाटल्यांचे संकलन झाले होते.संभाजी होळकर, किरण गुजर, दादासाहेब कांबळे यांची यावेळी भाषणे झाली. डोर्लेवाडी सारख्या ग्रामीण भागात ग्रामस्थ व तरुण मंडळांनी एकत्र येऊन राबविलेला महारक्तदान शिबिराचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत राज्य उत्पादन शुल्क पुणे जिल्हा अधीक्षक संतोष झगडे यांनी व्यक्त केले...  सोमनाथ सोमनाथ भिले यांनी प्रास्ताविक केले.कुमार देवकाते यांनी सूत्रसंचालन केले.प्रा. अंकुश खोत यांनी आभार मानले. चौकट.... पोलीस अधिकाऱ्यांनी केले रक्तदान ...दरम्यान आज उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांचाही वाढदिवस होता.त्यांनीही आपला वाढदिवस रक्तदान करून साजरा केला, तसेच राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक संतोष झगडे, त्यांच्या  विभागाचे १० अधिकाऱ्यांनी व बारामती पोलीस स्टेशनच्या १५ कर्मचाऱ्यांनी आज येथील शिबिरात रक्तदान केले.    छायाचित्र:  डोर्लेवाडी (ता.बारामती):  माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या महारक्तदान  शिबिरास  नागरिकांनी गर्दी केली होती.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test