सोमेश्वरनगर प्रतिनिधी
विवेकानंद अभ्यासिकेचे विध्यार्थीनी वनिता पिसे 2020 मध्ये लागलेल्या एम पी एस सी च्या परीक्षेच्या निकालामध्ये PSI झालेल्या वनिता पिसे आणि त्या बरोबरच मागच्या महिन्यात आर्मी च्या लागलेल्या निकालातून सोमेश्वर परिसरातून 4 आर्मी मधून भरती झालेले विध्यार्थी विराम कांबळे, सचिन सापटे, शरद गडदरे, युवराज ससे यांचा अभ्यासिकेच्या वतीने सत्कार सभारंभ पार पडला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून वडगाव पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार तसेच 2019 च्या mpsc परीक्षेमधून पोलीस उप अधीक्षक पदी निवड झालेल्या आरती पवार हे मान्यवर उपस्थित होते.
आरती पवार यांनी मुलांना स्पर्धा परीक्षेबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. मुलांशी सवांद साधला परीक्षेची तयारी करताना स्वतःला कसे सकारात्मक ठेवले होते. स्वतः मधला व स्वतःवरचा आत्मविश्वास कसा जागृत ठेवायचा या बद्दल सांगितले. तसेच कार्यक्रम मध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून आचार्य अकॅडमी बारामती चे संचालक ज्ञानेश्वर मुटकुळे सर होते सरांनी मुलांना करियर निवडताना कसा विचार करायचा या बद्दल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात हुशार व गरजू विध्यार्थ्यांना अभ्यासिकेच्या वतीने स्पर्धा परीक्षेची पुस्तके व रनींग चे बूट याचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे PSI योगेश शेलार यांच्या हस्ते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विवेकानंद अकॅडमी चे संचालक गणेश सावंत यांनी केले आणि आभार विकास पवार यांनी मानले.