सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती येथील बारामती सायकल क्लब ने आयोजित केलेल्या ८१ किलोमीटर च्या सायकल रॅलीत
होळ येथील बारामती सायकल क्लब व १७ वर्ष देश्या साठी सेवा बजावलेल्या सेवानिवृत्त इएक्स आर्मी रामदास कारंडे व सहकारी सचिन कारंडे यांनी सहभाग नोंदविला होता...
यांनी निरा ते बारामती आणि बारामती ते निरा असा ८१ किलोमीटर चा सायकल प्रवास करत देशाचे माजी कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या ८१ व्या वाढदिवस या निमित्त ८१ किलोमीटरचा सायकल प्रवास केला सर्वानाच आरोग्य संदेश देत आणि पवारांविषयी असणारा आदर व प्रेम त्यांनी बोलताना व्यक्त केले व रोजचा सायकल प्रवास हा आरोग्यदायी असल्याचा यानिमित्ताने जनतेला अनोखा संदेशही दिला.
हा सायकल प्रवास चालू असताना फलटण ची सहा वर्षाची स्वरा भागवत ही चिमुकली होती ... हिने १२ तासात १४३ किलोमीटरचा प्रवास केल्याने तिचेही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्प गुच्छ देत कौतुक झाले होते..