वालचंदनगर प्रतिनिधी अमोल रजपुत
वालचंदनगर ( ता.इंदापूर ) येथील हनुमान मंदिर परिसरात गेली काही दिवसापासुन विषारी सर्प म्हणुन ओळख असलेल्या घोणस सापडत आहे. परिसरात वाढलेले गवत व पडझड इमारतीमुळे सर्प अढळण्याचे प्रमाण वाढले आहे.
गेली काही दिवसापासुन हनुमान मंदिर आजुबाजुच्या परिसरात गवताचे व झाडाझुडपांचे प्रमाण वाढल्यामुळे विषारी , बिनविषारी सर्प अढळुन येत आहे.परिसरात घोणस , मण्यार , इंडियन क्रोब्रा हे विषारी तर धामन , गवती साप , तस्कर , कवड्या , येरुळा सह अन्य बिनविषारी सर्प अढळत आहेत.रात्रीच्या वेळी मानवी वस्तीतील विद्युत दिव्याजवळ किडे भक्श शोधार्थ अढळत आहेत. यामुळे ग्रामस्थांनी रात्रीच्या वेळी बाहेर पडताना बॕटरी , बुट घालणे सह अन्य योग्य ती दक्षता घेऊनच बाहेर पडावे.
चौकट
हनुमान मंदिर लगतच्या भागात मोठ्या प्रमाणावर घोणस सारखे विषारी सर्प अढळत आहेत. परिसरातील नागरीकांनी दक्षता घ्यावी. आत्तापर्यंत सापडलेले सर्प लासुर्णे येथील वनीकरणात सोडल्याचे वालचंदनगरचे सर्प मित्र बिरु माने यांनी सांगितले.
सोबत फोटो
वालचंदनगर ( ता.इंदापूर ) येथील परिसरात सापडलेला घोणस जातीचा विषारी सर्प निसर्गाच्या सानिध्यात सोडताना सर्प मित्र बिरु माने.