दौंड प्रतिनिधी राहुल आवचर
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे राज्याध्यक्ष अरुण गाडे यांच्या नेतृत्वाखाली तसेच विमुक्त घुमंतू बारा बलुतेदार ओबीसी आणि अन्य पिछडा संघाचे अध्यक्ष व माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली शनिवार दिनांक .5/12/2020पासून मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळावे .
मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्वरित देण्यात यावी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या केसमध्ये सरकारने तज्ञ वकिलाची नेमणूक करावी .राज्यातील नोकरीमधील अनुशेष भरून काढण्यात यावा या व इतर मागण्यांसाठी हे अमरण उपोषण करण्यात येणार आहे .या उपोषणात भैय्या शेलारे, गजानन थुल, हर्षवर्धन सोनवणे, एकनाथ मोरे ,गौतम कांबळे, आनंदराव खामकर ,सिताराम राठोड ,बलदेव आडे, शामराव हाडके , अनिल धांडे, विनोद मोहोळ, सरस्वती बागुल ,सुनिता राठोड , भीमराव घोरपडे, रामनाथ राठोड , गौतम मगरे या पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्ते व सभासद या आमरण उपोषणात सहभागी होणार आहेत अशी माहिती गौतम कांबळे राज्य महासचिव कास्ट्राईब शिक्षक कल्याण महासंघ यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली .
या आंदोलनामध्ये मूलनिवासी शिक्षक संघ व विमुक्त घुमंतू बारा बलुतेदार संघटना सहभागी होणार आहेत अशी माहिती दादा डाळिंबे जिल्हाध्यक्ष कास्ट्राईब शिक्षक कल्याण महासंघ पुणे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली .