नीरा प्रतिनिधी
शेतकरी आंंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विविध संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी भारत बंद ला
नीरा (ता.पुरंदर ) येथील व्यापाऱ्यांनी बाजारपेठ कडकडीत बंद ठेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मात्र अत्यावश्यक सेेवा सुरळीत सुरू होत्या.
केंद्र सरकारने सुधारित कृषि कायदा मागे घ्यावा या मागणीसाठी गेल्या १४ दिवसांपासून राजधानी दिल्लीत विविध राज्यांतील शेतकरी संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेतकरी संघटनांनी मंगळवारी (दि.८)'भारत बंद' ची हाक दिली होती. तसेच महाविकास आघाडी, शेतकरी संघटना , स्वाभिमानी शेतकरी संघटना, व्यापारी संंघटना आदी संघटनांनी देखील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन केले होते. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि.८) नीरा ( ता. पुरंदर) येथील किराणा दुकाने, भाजी मंडई, हाँटेल, चहा स्टाँल, स्वीट होम, कापड दुकानांंसह विविध दुकाने कडकडीत बंद ठेऊन व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविला. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट दिसत होता.
दरम्यान, हाँस्पिटल, दवाखाने, मेडिकल, बँका, पतसंस्था, शाळा, महाविद्यालय आदी अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरू होत्या.