Live पुणे बारामती : सोमेश्वरनगर प्रतिनिधी
शेतकरी आंंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विविध संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी भारत बंद ला
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर मुख्य बाजारपेठेतील करंजेपुल येथील व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद ठेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
अत्यावश्यक सेेवा सुरळीत सुरू होत्या.
केंद्र सरकारने सुधारित कृषि कायदा मागे घ्यावा या मागणीसाठी गेल्या १४ दिवसांपासून राजधानी दिल्लीत विविध राज्यांतील शेतकरी संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेतकरी संघटनांनी मंगळवारी (दि.८)'भारत बंद' ची हाक दिली होती. तसेच महाविकास आघाडी, शेतकरी संघटना , स्वाभिमानी शेतकरी संघटना, व्यापारी संंघटना आदी संघटनांनी देखील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन केले होते. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि.८) सोमेश्वरनगर, वानेवाडीतील मुख्य बाजारपेठ आहे तेथे असणार्या किराणा दुकाने, भाजी मंडई, हाँटेल, चहा स्टाँल, स्वीट होम, कापड दुकानांंसह विविध दुकाने कडकडीत बंद ठेऊन व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविला. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट दिसत होता.
तसेच आजच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे पत्र शेतकऱ्यांच्या वतीने वडगाव निंबालकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार, तसेच पोलीस कॉन्स्टेबल, ज्ञानेश्वर सानप, वाबळे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी चे युवा कार्यकर्ते ऋषिकेश गायकवाड, सागर गायकवाड, निलेश गायकवाड, गणेश जाधव, हरीश गायकवाड, सुहास गायकवाड यांच्यासह शेतकरी लक्ष्मण गायकवाड विकास गायकवाड यांच्यासह मोठया संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, हाँस्पिटल, दवाखाने, मेडिकल, बँका, पतसंस्था, शाळा, महाविद्यालय आदी अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरू होत्या.