Type Here to Get Search Results !

शिवरायांनी महाराष्ट्र घडवले आणि हिंदवी स्वराज्य संभाजी महाराजांनी रुजवलेते तर स्वाभिमानाने जगावं असा आदर्श समाज्या समोर ठेवला : पुरुषोत्तम जगताप


सोमेश्वरनगर प्रतिनिधी

हर हर महादेवाची घोषणा करून शिवरायांनी महाराष्ट्र घडवले. आणि मनमनात हिंदवी स्वराज्य रुजवले तर संभाजी महाराजांनी लढावं कसं अनं स्वाभिमानाने जगावं कसं असा आदर्श समाजासमोर ठेवला असे गौरवपूर्ण उदगार सोमेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी व्यक्त केले
    आधार सोशल फाउंडेशन च्या प्रथम वर्धापन दिनाच्या निमित्ताने व गड किल्ले स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते मुरूम ग्रामपंचायत कार्यालयातील अस्मिता भवन येथे हा कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी किल्ल्याचे परीक्षण व प्रमुख पाहुणे उपक्रमशील शिक्षक राजेंद्र बालगुडे होते याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते म्हणाले किल्ले बघायचे नसतात तर अनुभवायची असतात. रायगडावरील माची व बुरुंज ट्रेकिंग व सहल यातील फरक सांगत किल्ल्याच्या बांधकामाचा आदर्श किल्ल्यावरील निसर्ग मानवी जीवनाला कसा हितकारक आहे ते सांगितले.
  यावेळी  आधार सोशल फाउंडेशनच्या  पुस्तिकेचे  प्रकाशन  करण्यात आली  व स्पर्धेतील अनुक्रमे पहिल्या तीन मध्ये हे मुरूम येथील चि. यश संजय भगत यांनी साकारलेला किल्ले राजगड प्रथम क्रमांक तर कलाईट ग्रुप मळशी यांनी किल्ले प्रतापगड व व रणरागिनी प्रतिष्ठान वाघळवाडी यांनी साकारलेला किल्ला रोहिडा यांना विभागून द्वितीय क्रमांक देण्यात आला तर श्रीशैल शिवप्रसाद चव्हाण यांनी साकारलेल्या राजगड या प्रतिकृतीस तृतीय क्रमांक देण्यात आला. उत्तेजनार्थ विराज महादेव चव्हाण राजगड तर शिवेंद्र चंद्रशेखर भोसले यांना देण्यात आली सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ ग्रामस्थ एकनाथ शिंगटे, पंढरीनाथ राऊत, प्रदीप कणसे, दीपक साखरे, मंगेश जगताप ,विजय जगताप, संकेत जगताप ,डॉ. मयूर खटावकर, वैभव बोत्रे, निखिल शिंदे,ऋषिकेश चव्हाण, विकास नवले इत्यादी युवक वर्ग उपस्थित होता.
  सोमेश्वर पब्लिक स्कूल चे शिक्षक सोमेश हेगडे वव विद्यार्थीनी यांनी आवेशपूर्ण स्फूर्तीगीताने कार्यक्रमाची सुरुवात केली प्रास्ताविक रोहित जगताप तर आभार स्वप्नील काकडे आणि सूत्रसंचालन युवराज शिंदे यांनी केली

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test