सोमेश्वरनगर प्रतिनिधी
वाघळवाडी-सोमेश्वरनगर( ता बारामती) येथील ग्रामपंचायती मध्ये विविध विकास कामांच्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून मिळालेल्या अडीच कोटी रुपयांच्या निधीच्या विकास कामांचा भूमिपूजन कार्यक्रम पार पडला. भूमिपूजन कार्यक्रम राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संभाजी होळकर व जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती प्रमोद काकडे यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप होते.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून 25/15 लेखाशीर्ष अंतर्गत, जिल्हा परिषदेचे सभापती प्रमोद काकडे यांच्या माध्यमातून, ग्रामपंचायत १४ वा वित्त आयोग, ग्रामपंचायत ग्रामनिधी अश्या जवळपास अडीच कोटी ( २.५ )रुपयांच्या निधीची कामे गावात होणार आहे. यामध्ये भूमिगत गटर, डांबरीकरण रस्ते, पेव्हर ब्लॉक रस्ते,सभामंडप, एल ईडी दिवे, पाणी पुरवठा वितरण,चौक शुभोभिकरण, आरोग्य, प्राथमिक शाळा अंगणवाडी शिक्षण साहित्य व दुरुस्ती, ग्रामपंचायत कार्यालय दुरुस्ती,अशी कामे हाती घेण्यात आली आहेत.
गावातील विकास कांमाच्या साठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून कोट्यवधी रूपयांचा निधी देता आला.पुढिल काळातही निधीची कमतरता भासणार नाही. कामे करताना त्या कामांचा दर्जा ऊत्तम राखून गावाने ठेकेदाराच्या कडून कामे करुन घेतली पाहिजे .गावात व सोमेश्वर कारखाना यांना पिण्याचे शुध्द पाणी नागरिकांना मिळावे यासाठी वाघळवाडी गावात जिवन प्राधिकरण योजनेत करण्यात येणार असल्याचे असे बारामती राष्ट्रवादी संभाजी होळकर जिल्हा परिषद मधुन मागाल तितका निधी उपलब्ध करुन देण्यात येईल कार्यक्रम प्रसंगी बोलताना प्रमोद काकडे यांनी यांनी कार्यक्रम दरम्यान बोलताना सांगितले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना पुरुषोत्तम जगताप म्हणाले की, ग्रामपंचायती मधील सर्व पदाधिकारी एकत्र येऊन गावचा विकास साधत आहे.युवक चांगल्या पध्दतीने काम करत आहेत. या मिळालेल्या निधी मधुन गावचा सर्वांगीण विकास होईल अशी खात्री आहे.तसेच पिण्याचे स्वच्छ पाणी गावातील नागरीकांना मिळण्यासाठी जिवण प्राधिकरण योजनेसाठी कारखाना मालकीची जागा देण्यासाठी तयार आहे असे आपल्याला मनोगतात व्यक्त केले
सैन्य दलात निवड झालेल्या ऊसतोड कुटुंबातील सचिन सापटे, युवराज ससे, कन्नडवस्ती मधिल विराम कांबळे या तिन्ही कष्टकरी कुटुंबातील युवकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमा प्रसंगी सरपंच नंदा सकुंडे, यांनी गावातील स्मशानभुमि होण्यासाठी लवकर गावातील सर्वांना विचारात घेऊन सर्व कार्यवाही पूर्ण करु असे सांगितले. उपसरपंच जितेंद्र सकुंडे, राष्ट्रवादिचे तालुका उपाध्यक्ष सतिश सकुंडे, मुंबई हायकोर्ट चे वकिल अनंत सकुंडे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमा प्रसंगी सोमेश्वर कारखान्याचे उपाध्यक्ष शैलेश रासकर, पंचायत समिती सदस्या निता फरांदे, राष्ट्रवादिचे नवी मुंबईचे उपाध्यक्ष विजय सावंत संचालक लक्ष्मण गोफणे, विक्रम भोसले समर्थ ज्ञानपीठचे अध्यक्ष अजिंक्य सावंत, तंटामुक्ती अध्यक्ष महादेव सावंत, सोसायटीचे चेअरमन संजय सावंत, , राष्ट्रवादिच्या महिला सचिव सुचेता साळवे, सदस्य पांडूरंग भोसले, चेतन गायकवाड, सदस्या सुरेखा सावंत, लता शिंदे, श्रध्दा भुजबळ,ग्रामविकास अधिकारी चंद्रशेखर काळभोर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा कार्यकर्ते तुषार सकुंडे यांनी केले. प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य हेमंत गायकवाड यांनी केले. राष्ट्रवादिचे शिक्षक सेल तालुका अध्यक्ष अविनाश सावंत यांनी कार्यक्रमाच्या उपस्थितांचे आभार मानले.