इंदापूर तालुका प्रतिनिधी शहाजीराजे भोसले
समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा , विद्यालयातील कृषिदूतानी ग्रामीण कृषी जनजागृती कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत रेडणी तालुका इंदापूर येथील शेतकऱ्यांना पिक विमा योजनेविषयी प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरी जाऊन मार्गदर्शन केले .
या पार्श्वभूमीवर डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला. संलग्नित समर्थ कृषी महाविद्यालय ,देऊळगाव राजा. येथील अंतिम वर्षातील विद्यार्थी गणेश हरिचंद्र काळे, यांनी गावातील शेतकरी यांना या योजनेविषयी माहिती सांगितली. गावातील शेतकऱ्यांनी प्रत्येक योजनांचा लाभ घ्यावा आणि त्या योजनांचा कालावधी संपायच्या आत प्रत्येक योजनांचे अर्ज भरावेत असे; त्या ठिकाणी सांगण्यात आले .
सदर योजनेच्या प्रसारासाठी, महाविद्यालयाचे प्राचार्य.नितीन मेहेत्रे सर, प्रा राजपूत सर,कृषी अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा नारायण बोडखे सर, प्रा नागरे सर, यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी कृषिदूत गणेश हरिचंद्र काळे आणि शेतकरी सचिन तरंगे, रणजीत तरंगे ,विठ्ठल काळे, पोपट तरंगे ,महादेव तरंगे, बाजीगर देशमाने ,उपस्थित होते.



