इंदापूर तालुका प्रतिनिधी शहाजीराजे भोसले
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सरकोली येथे भालके कुटुंबीयांची मंगळवारी (दि.१) भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी स्व. आ.भारतनाना भालके यांच्या अनेक आठवणींना हर्षवर्धन पाटील यांनी उजळा दिला व भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
या भेटीत हर्षवर्धन पाटील यांनी स्व. भारतनानांचे चिरंजीव भगीरथ भालके यांचे सांत्वन केले. आ.भारतनाना हे लढवय्ये नेतृत्व होते. विधीमंडळात आम्ही अनेक वर्षे बरोबर काम केले.या कालावधीतील अनेक प्रसंग हर्षवर्धन पाटील सांगितले. तसेच सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भारतनाना भालके यांच्या निवडणूक प्रचाराची सांगता सभा माझ्या उपस्थितीत झाल्याची आठवणही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी सांगितली. याप्रसंगी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अनेक संचालक, प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.