इंदापूर प्रतिनिधी आदित्य बोराटे
भारतीय रेल्वेमध्ये तिकीट कलेक्टर, ज्युनिअर क्लार्क, वर्कशाॅप डिपार्टमेंट (तांत्रीक शाखा) इत्यादी पदावर कायमस्वरूपी नोकर भरती निघाली असुन सदर जागा भरण्यासाठी आमच्या ओळखीची खास माणसे व रेल्वेतील अधिकारी असल्याचे खोटे अमिष दाखवुन इंदापूर तालुक्यातील सुशिक्षीत बेकारांना ४४ लाख, ५३ हजार, ५०५ रूपयांना गंडा घालुन फसवणुक करणार्या सहा सुशिक्षीत भामट्याविरूद्ध नवनाथ अजिनाथ भोसले.(वय २९) रा.वडापुरी, ता.इंदापूर, जि.पूणे यांनी
इंदापूर पोलीस ठाण्यात फीर्याद दीली असुन पोलीसांनी तीन आरोपींना गजाआड केले आहे.
गणेश राधाकिशन वर्पे.रा.वरवंडी, ता.संगमनेर
,जि.अहमदनगर,अंकुश विजयराव धाकडे रा.सावळी ब्र, ता.अचलपुर,जि. अमरावती,मनोज रावसाहेब गायकवाड.(वय ४०), रा.शिवाजी चौक, ता.मोर्शी, जि. अमरावती, मनिष चंद्रकांत वानखेडे.(वय ३८), रा. शावाजी चौक, ता. मुर्शी, जि.अमरावती, संगश रामचंद्र धाकडे.(वय २९), रा.सावळी,बु., ता.अचलपुर,जि. अमरावती व महेंद्र उर्फ चिंटु शिवाजी काटकर. रा.वडापुरी, ता.इंदापूर, जि. पूणे अशी आरोपींची नावे आहेत.तर वरील आरोपींनी इंदापूर तालुक्यातील आणखी काही जणांना रोख रकमेला अशाच प्रकारे गंडा घालुन फसवणुक केली असुन त्यापैकी आणखी दोन जणांनी इंदापूर पोलीसांत वरील आरोपीविरूद्ध तक्रारी दाखल केल्या असल्याची माहीती इंदापूर पोलीसांनी दीली आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की फिर्यादी यांचे गावात राहणारा चिंटु शिवाजी काटकर याने २०१८ मध्ये फीर्यादी यांचे घरी येवुन रेल्वेमध्ये तिकीट कलेक्टर व ज्युनिअर क्लार्क, व वर्कशाॅप डीपार्टमेंट (तांत्रक शाखा) या पदासाठी कायमस्वरूपी नोकर भरती नीघाली असुन त्याठीकाणी माझे ओळखीचे खास माणसे व रेल्वेतील अधिकारी असल्याचे सांगुन फिर्यादी व त्यांची पत्नी यांना रेल्वेमध्ये नोकरीची कायम आॅर्डर करून देण्याचे आश्वासन दीले. व दुसर्या दिवशी आणखी इसमांना घेवुन घरी आला, व हे लोक रेल्वे अधिकार्यांच्या खास संपर्कातील असुन त्यांची नावे वरील प्रमाणे असल्याचे सांगीतले.रेल्वेमध्ये नोकरी करायची असेल तर प्रत्येकी १५ लाख रूपये द्यावे लागतील असे सांगुन यापुर्वीही काही लोकांना नोकरी लावली असलेबाबतचे पुरावे आरोपींनी फीर्यादी यांना दाखविल्याने फीर्यादी यांचा आरोपींच्या बोलण्यावर विश्वास बसला. व त्यानंतर एक वर्षाच्या आत आर्डर काढुन देण्यासाठी टोकण म्हणुन काही रक्कम व कागदपत्रांची मागणी आरोपींनी फीर्यादी यांचेकडे केली.
एक आठवड्यानंतर आरोपी महेंद्र काटकर याने फीर्यादी यांना फोन केला व इंदापूर येथील नगरपरिषदेच्या बागेजवळ पैसे व कागदपत्र घेवुन येण्यास सांगुन त्याचेसोबत त्याचे बाॅस गणेश वर्पे व वरील साथीदार आले आले असल्याचे सांगीतले. त्यावेळी फीर्यादी यांनी महेंद्र काटकर याची भेट घेतली व ठरलेली रोख रक्कम एनईएफटी करतो असे सांगुन फीर्यादी नवनाथ भोसले यांचेकडुन वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगुन वरील आरोपींनी संगनमताने २९ लाख, ७९ हजार,८७० रूपयांना नोकरीचे खोटे अमिष दाखवुन फसवनुक केली असल्याचे फीर्यादीत नमुद केले असुन याबाबत इंदापूर पोलीसांनी मनोज गायकवाड,मनिष वानखेडे व संगश धाकडे या तीन आरोपींना अटक केली आहे.तर तीनजण फरारी असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगीतले.
पोलीस तपासात वरील आरोपींनी इंदापूर तालुक्यातील आणखी काहीजणांची अशीच फसवणुक केल्याचे उघड झाले आहे, त्यामध्ये आसमा अब्दुलगणी मुलाणी मुलाणी, २ लाख,२१ हजार,२५ रूपये,संजय अंकुश ठवरे २ लाख २१ हजार,६२५, अनिल चतुर्भुज पवार २ लाख ९२ हजार १५, देवांगणा राम जाधव (पूणे) २ लाख,पाच हजार, सत्यवान कांतीलाल पासगे एक लाख,१८ हजार,५१५, श्रीकांत पांडुरंग राऊत. एक लाख,९५ हजार,१५ रूपये व मयुर रमेश कळसाईत अशी फसवणुक झालेल्या इतरांची नावे असुन एकुण ४४ लाख,५३ हजार,५०५ रूपयांची फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला असुन यापैकी श्रीकांत राऊत व मयुर कळसाईत यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात वरील आरोपी विरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल केले असुन पुढील तपास इंदापूर पोलीस उपनिरिक्षक डी.डी.देठे हे करत आहेत.
————————————————————————
आरोपी हे फीर्यादी नवनाथ भोसले व तालुक्यातील फसवणुक झालेल्या इतरांकडे भेटण्यासाठी जाताना अंगावर कडक कपडे व लाखो रूपये कींमती असलेल्या महागड्या जग्वार, बी.एम.डब्लु यासारख्या अलिशान चारचाकी गाड्यांचा वापर करून हाताच्या पाचही बोटात सोन्याच्या अंगट्या घालुन जात असत.व पुढील माणसावर छाप पाडत असत. आनेजण आरोपींचा अंगातील पहेराव, अंगावरील सोने व त्यांचेकडे असणार्या महागड्या गाड्या पाहुन त्यांचेवर विश्वास ठेवत असत व त्यांचे बोलण्यावर विश्वास ठेवुन नोकरीसाठी त्यांचेकडे पैसे जमा करत असल्याची फसगत झाली असल्याचे समोर आले आहे.
————————————————————————