बारामती तालुका पोलीस ठाणे येथे एका हॉटेल चालकास काही अनोळखी युवकांनी मारहाण करून जबदस्तीने पैसे चोरून नेहल्याबाबत जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयातील पाहिजे आरोपी व त्याचे साथीदार है पिस्टल विक्री करण्यासाठी रूई पाटी, बारामती येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शोध पचकाचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल पांढरे, विजय वाघमोडे यांना मिळाली होती. त्याप्रमाणे गुन्हे शोध पथकाने रूई पाटी,बारामती येथून
जबरी चोरीतील पाहिजे आरोपी नामे अदिनाथ झवर गिरमे वय २१ वर्षे,रा.पाटस,ता.दौड जि.पुणे यास त्याबाबत घेवून त्यांची आटीवा मोटार सायकल क.एम.एच ४२ ए व्ही ०६८१ ची तपासणी केली असता मोटार सायकलच्या डिकी मध्ये एक पिस्तुल व २ शिरूर, जि बिड २. अमोल रमेश् गर्जे वय २२ वर्षे राहणार.सिरसाठवाडी,ता.पाधडी जि.अहमदनगर व इतर दोन युवकांना यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता आणखी ६ पिस्तुल व ८ काडतुसे असे एकुण ७ पिस्टल व १० काडतुसे असे एकुण ( किंमत अंदाजे २ लाख ३१ हजार रू ) या मुददेमाल मिळून आला असून सदरचे पिस्टल हे त्यांनी मध्य प्रदेश येधून विक्री साठी आणल्याची कबुली दिली आहे. सदर प्रकरणी ३ गुन्हे नोंद करण्यात आले असून
आणखी २ गुन्हे दाखल करत आहेत. नमुद इसमांना अटक करण्यात आलेले असून तपास सुरू आहे.बारामती उपविभागमध्ये सन २०२० मध्ये २० गावठी पिस्टल हस्तगत करण्यात आले होते व २०२१ मध्ये आता पर्यंत ८ गावठी पिस्टल हस्तगत करण्यात आलेले आहेत. आतापर्यंत बेकायदेशिर पिस्टल विक्री बाबतची पुणे ग्रामिण पोलीस दलातील सर्वात मोठी कारवाई आहे.सदरची कारवाई मा. मा.पोलीस अधिक्षक,पुणे ग्रामीण.अभिनव देशमुख सो,अप्पर पोलीस अधिक्षक.मिलीद मोहिते,उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश ढवाण सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे,पोलीस हवालदार दादा ठोंबरे,पोलीस कॉस्टेबल नंदु जाधव,राहुल पांढरे,विजय वाघमोडे,मंगेश कांबळे,विनोद लोखंडे,दत्तात्रय मदने, रणजित मुळीक यांनी केलेली आहे.