बारामती प्रतिनिधी
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ महाराष्ट्र शासनाच्या वतीने २०१६ आणि २०१७ या दोन वर्षाचे कामगार भूषण आणि गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार दिले जातात.दरवर्षी वरील पुरस्कार महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक विभागातील कामगार क्षेत्रात काम करणारे कामगार यांना शासनामार्फत दिले जातात. यासाठी राज्यातून अर्ज मागून मुलाखती घेऊन दरवर्षी अंतिम ५० ते ५५ कामगारांची निवड केली जाते सन्मानचिन्ह १५ ते २५ हजार रुपये रोख आणि शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असते सन २०१६ व २०१७ चे पुरस्कार मागील वर्षी जाहीर झाले परंतु कोरना प्रादुर्भावामुळे वितरण कार्यक्रम केला नाही. आज पुरस्कार वितरण सोहळा ०९ फेब्रुवारी २०२१ रोजी संध्याकाळी ०४ वाजता संपन्न झाला.
या पुरस्कारासाठी सन २०१७ या वर्षासाठी पुणे जिल्हा ग्रामीण औद्योगिक क्षेत्र बारामती तालुक्यातून बाळासाहेब आबुराव बारवकर एकमेव गुणवंत कामगार म्हणून त्यांची निवड झाली आहे. बारवकर हे सध्या निंबुत निरा येथील जुबिलंट लाइफसायसेन्स या पेट्रोकेमिकल कंपनीत गेले तीस वर्ष इंजिनिअरिंग विभागात सुपरवायझर या पदावर कार्यरत आहे जुबिलंट कंपनी स्थापनेपासून ते पहिलेच एकमेव असे कामगार आहेत की ज्यांना हा सन्मान प्राप्त झाला आहे,असे बाळासाहेब आबूराव बारवकर यांनी आपले मत व्यक्त केले.
दिलीप वळसे-पाटील मंत्री, कामगार राज्य ,उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू ,राज्यमंत्री कामगार महाराष्ट्र राज्य .यांच्या शुभहस्ते महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे सेनापती बापट मार्ग मुंबई च्या सांस्कृतिक भवनात संपन्न झाला. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राहुल शेवाळे , लोकसभा सदस्य दक्षिण-मध्य मुंबई, कालिदास कोळंबकर ,विधानसभा सदस्य वडाळा ,श्रीमती विनिता वेध सिंघल प्रधान सचिव कामगार ,महाराष्ट्र शासन. डॉक्टर महेंद्र कल्याणकर कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य, यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.