वाल्हे प्रतिनिधी - सिकंदर नदाफ.
पुरंदर तालुक्यात ३२ वे रस्ता सुरक्षा अभियान २०२१ उत्साहात संपन्न झाले .
या अभियानानिमित्त प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे आणि ससुन रुग्णालयात पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिवे येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन देखील करण्यात आले होते,तर ३२ वे रस्ता सुरक्षा अभियान २०२१ अंतर्गत "सडक सुरक्षा, जीवन रक्षा" हे ब्रीदवाक्य घेऊन मोटर वाहन निरीक्षक संतोष झगडे यांनी वाहन मालक व वाहन चालक यांना महत्वाच्या सुचना दिल्या यामध्ये सीट बेल्ट वापरणे,लेनची शिस्त पाळणे,वळण्यापुर्वी योग्य तो इशारा करणे, गाडी ओव्हरटेक नेहमी उजव्या बाजुनेच करणे, प्रखर किंवा रंगीत दिव्यांचा वापर करू नका, मोबाईल फोन वर बोलु नका,वेग मर्यादित ठेवा,दारु पिऊन गाडी चालवू नका, अशा महत्त्वाच्या सुचना देऊन वाहनांची देखभाल कशी करावी या विषयी माहिती दिली या सुरक्षा अभियानांतर्गत येथे आलेल्या मोटार मालक व वाहन चालक यांना आर. टी. ओ. ऑफिसर संतोष झगडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले असता ७८ पेक्षा जास्त जनांनी रक्तदान करुन सहभाग नोंदवला. यावेळी मोटार वाहन निरीक्षक संतोष झगडे, महेश पवार, जितेंद्र उपगन्लावार, सुरेश आव्हाड, शाहिद जामदार, विजय लोखंडे, अनिल खेमनार, मारुती हजारे,किरण बनसोडे,आदि तसेच कर्मचारी श्रीमती सी.बी.जगताप , दिलीप सोनटक्के, बाळकृष्ण मिसाळ आदिंनी रक्तदान केले, तत्पूर्वी प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे,उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाने,संजीव भोर, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी पवन नव्हाडे यांनी रक्तदान शिबीराचे उद्घाटन केले, डॉ. अजित शिंदे,संजय ससाने यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.