वलचंदनगर प्रतिनिधी
आज दि.28/2/21 रोजी वालचंदनगर पोलीस स्टेशन कडून मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी फिरणा-या 70 इसमावर कारवाई करून 13 हजार रू. दंड वसूल करण्यात आला आहे... वालचंदनगर पोलीस ठाणे हद्दीत वालचंदनगर, भवानीनगर, कळस, लासुर्णे, शेळगाव अशा बीट प्रमाणे पोलीस स्टाफ नेमलेला असुन विना मास्क कोणीही सार्वजनिक ठिकाणी फिरू नये तसेच महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावे अन्यथा घरीच थांबा सुरक्षित रहा असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक सुभाष मुंढे यांनी केले आहे