इंदापूर तालुका ग्राम विकास प्रतिष्ठानच्या विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब येथील वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. अरुण मारुती कांबळे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांची विद्यावाचस्पती (पीएचडी) पदवी मिळवली. त्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आर्थिक धोरणे आणि व्यवस्थापन पद्धती यांचे टीकात्मक परीक्षण या विषयावर आपला प्रबंध सादर केला. त्यांना पुणे येथील हुजूरपागा महिला वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ थोरात वाय. आर. यांनी मार्गदर्शन केले .त्यांनी बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय पुणे या रिसर्च सेंटर मधून पीएचडी चा प्रबंध सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला सादर केला. ही बहुमोल पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांचे इंदापूर तालुका ग्राम विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा श्रीमती आनंदीबाई रणसिंग, सचिव प्रकाश कदम, खजिनदार हनुमंतराव रणसिंग, विश्वस्त वीरसिंह भैय्या रणसिंग ,रणवरे तात्या, कुलदीप हेगडे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अंकुश आहेर, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर स्टाफ यांनी अभिनंदन केले. तसेच महाराष्ट्र राज्याचे राज्य मंत्री व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मा दत्तात्रय भरणे मामा यांनीही त्यांचे अभिनंदन केले व त्यांना मोलाचे सहकार्य केले. त्यांचे प्राथमिक शिक्षण रत्नपुरी पाठशाळा ,माध्यमिक शिक्षण वालचंद विद्यालय व ज्युनियर कॉलेज कळंब येथे झाले तसेच महाविद्यालयीन शिक्षण तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती येथे झाले. या महाविद्यालयातील प्रा डॉ एन एम नारे तसेच अनेकांत इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज बारामती येथील प्रा डॉ दत्तात्रय मोरे आनंदराव थोरात यांनीही त्यांना मोलाचे सहकार्य केले केले .त्यांना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन रमेश आप्पा थोरात व व्हाईस चेअरमन सौ अर्चना घारे, मुख्य शाखेतील व्यवस्थापकीय संचालक प्रताप सिंह चव्हाण , विविध विभागांचे मॅनेजर्स, सहाय्यक व उपव्यवस्थापक , बँकेच्या विविध शाखातील व्यवस्थापक, विकास अधिकारी व झोनल अधिकारी तसेच महाविद्यालयातील सर्व स्टाफ, मित्र परिवार व कुटुंबीय यांनीही मोलाचे सहकार्य केले .इंदापूर तालुका ग्राम विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिवंगत विश्वासराव दादा रणसिंग , सचिव दिवंगत अण्णासाहेब हेगडे, उपाध्यक्ष दिवंगत बाजीराव मोरे, दिवंगत प्राचार्य रमेशचंद्र सूर्यवंशी यांचीही त्यांना यामध्ये प्रेरणा मिळाली.
प्रा.अरुण मारुती कांबळे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांची विद्यावाचस्पती (पीएचडी) पदवी
February 28, 2021
0
इंदापूर तालुका प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले :
Tags