Type Here to Get Search Results !

पुणे जिल्हा औद्योगिक सर्व सेवा सहकारी सोसायटीची अमृतमहोत्सवी सभा संपन्न.



सोमेश्वरनगर प्रतिनिधी

पुणे जिल्हा कृषी औद्योगिक ही संस्था पूर्ण कर्जमुक्त असून स्वभांडवली करत हुकमी उत्पन्नांचा स्रोत उभा करत संस्था भक्कम केली आहे. असे  सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे यांनी अध्यक्ष स्थानी बोकताना व्यक्त केले.पुणे जिल्हा औद्योगिक संघाने नेहमीच शेतकरी हितही जपले असेही ते म्हणाले

 नीरा (ता. पुरंदर) येथे पुणे जिल्हा औद्योगिक सर्व सेवा सहकारी सोसायटीच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. अध्यक्षस्थानी शहाजी काकडे होते. याप्रसंगी राजेंद्र काकडे, सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक मानसिंग जगताप, दिग्विजय जगताप, विजयदेवी निंबाळकर, गौरव काकडे, विजय काकडे, डॉ नारायण रणवरे, अँडो. तानाजी गायकवाड, बबन मासाळ, विजयसिंह नलवडे, मोहन खोमणे, हरिश्चंद्र पिंगळे, अरुण भागवत, ताराबाई जगताप, श्रीरंग धुमाळ यांच्यासह सभासद उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष शहाजी काकडे पुढे म्हणाले, संस्था स्वभांडवली करतच इफको, कृभको अशा विविध संस्थांची मदत घेत आहोत. काही काळ संस्था अडचणीत गेली होती मात्र पुन्हा कधीही अडचनीत जाणार नाही असे नियोजन करत असल्याचे सांगत कोविड च्या महामारीमुळे उद्योग धंदे,
छोटेमोठे व्यवसायाची आर्थिक चक्र थांबली, हा महामारीची फार मोठी झळ देशाबरीबरच जगाला बसली असल्याचे काकडे यांनी सांगितले.कार्यक्रमात भाऊसाहेब सपकळ, सतीश जगताप, गुलाबराव गायकवाड, बापूराव येडे, शिवाजी पिंगळे, शिवाजी
नवले, सुनीता अरुण काकडे आदी सभासदांचा विशेष योगदान दिल्याबद्दल सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सभासदांना दहा टक्के लाभांश देण्याचा तसेच इमारत निधीसाठी वीस टक्के नफा राखून ठेवणे आणि अडीच टक्के चढ उतार निधी राखून ठेवण्याचे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. तसेच मागील वर्षात १४ ऑक्टोबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे सणसर खत डेपोमध्ये पाणी शिरून झालेले नुकसान, मयत व्यक्तींची येणे बाकी अशा बाबीमधील १२ लाख २५ हजार इतकी रक्कम गंगाजळीमधून निर्लेखीत करण्याचाही निर्णय घेण्यात आला.

   संस्थेचे व्यवस्थापक जगन्नाथ पिंगळे यांनी अहवाल वाचन केले. तर उपाध्यक्ष मानसिंग जगताप यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test