वडगाव निंबाळकर प्रतिनिधी
वडगाव निंबाळकर ता.बारामती येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पारंपारिक पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गावामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. येथील श्री छत्रपती जाणता राजा युवा प्रतिष्ठानच्या वतिने शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व कार्यक्रम कोरोनाचे नियम पाळून करण्यात आले. यामध्ये तालुका स्तरीय वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा, लाठी काठी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिवजयंती निमित्त गावामध्ये भगवे झेंडे व कमानी उभारण्यात आल्या होत्या. तरूणांनी जय भवानी,जय शिवाजी असा जयघोष करत किल्ले तोरणागड, वेल्हा येथुन शिवज्योत आणली. यावेळी गावातील महिलांनी शिवज्योतीचे स्वागत केले. मात्र यंदा कोरोनामुळे शिवजयंतीच्या जल्लोषावर बंधन आले. कोरोनाचे वाढते संक्रमण पाहून यावर्षीची मिरवणूक रद्द करण्यात आली. सायंकाळी गेल्या वर्षभरातील कोरोना संकटात जीवावर उदार होऊन सामाजिक कार्य, आरोग्य सेवा करणा-यां व्यक्तिंचा प्रतिष्ठानच्या वतीने 'कोव्हीड योद्धा' म्हणून सन्मान करण्यात आला. श्री छत्रपती जाणता राजा प्रतिष्ठान युवा प्रतिष्ठानच्या वतीने भाजपाच्या माजी पुणे जिल्हा अध्यक्ष संगिताराजे राजेनिंबाळकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र काळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. मनोज खोमणे, निवृत महसुल उपायुक्त शिवाजी राजेनिंबाळकर, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष दिलीप खैरे, बारामती पंचायत समितीचे माजी उपसभापती अविनाश शिंदे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र राजेनिंबाळकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे, ग्रामविकास अधिकारी शहानुर शेख, सामाजिक कार्यकर्ते विजय हिरवे, बहुजन हक्क परिषदेचे नानासाहेब मदने, शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष सचिन साठे, सुनिल यादव, सुरेश निकम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश आगम यांनी केले आभार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र पवार यांनी मानले.