वाल्हे प्रतिनिधी - सिकंदर नदाफ
संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असलेली धनगर समाज बहुउद्देशीय ( धर्मादाय) विकास सेवा संस्था हडपसर, पुणे या संस्थेचे सर्व सदस्य होळकर घराण्याचे थेट सोळावे वंशज युवराज यशवंतरावराजे होळकर यांची भेट घेणार असुन महाराष्ट्रातील असलेल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक वास्तु,तलाव, धर्मशाळा आदि विषयांवर चर्चा करणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष दिलीप काटकर यांनी सांगितले
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अनेक ठिकाणी मंदिरे,तलाव, धर्मशाळा, भोजनालय, बारवा,घाट,छत्री मंदिरे, आदि ऐतिहासिक वास्तु निर्माण केल्या आहेत परंतु त्या ऐतिहासिक वास्तु नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत तर काही ठिकाणी राजकीय व्यक्तींनी त्याच्यावर कब्जा केला आहे मध्यंतरीच्या काळात मध्यप्रदेश सरकारने अहिल्यादेवी होळकर यांच्या असणा-या सर्व ऐतिहासिक वास्तु ताब्यात घेतल्या आहेत, त्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने देखील महाराष्ट्रातील असणा-या अहिल्यादेवी होळकर यांच्या अनेक जागा, ऐतिहासिक मंदिरे,तलाव, धर्मशाळा आदि वास्तु ताब्यात घ्याव्यात ह्या सर्व ऐतिहासिक वास्तु कशा पद्धतीने जतन करता येतील आणि येणाऱ्या भावी पिढीला त्याची माहिती राहावी या साठी सर्व विषयांवर चर्चा करून युवराज यशवंतरावराजे होळकर यांचे मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात धनगर समाज बहुउद्देशीय धर्मादाय विकास सेवा संस्थेच्या माध्यमातून बाळासाहेब डफळ, रमेश शेठ लेंडे, मच्छिंद्र पिसे, धनंजय लंबाते, बाळासाहेब ढोरमारे, सुहास राहिंज,जिवराज वाघमारे, महादेव वाघमोडे, अनिल धायगुडे, माणिकराव चोरमले, रमेश सावळकर, बंडोपंत नजन, सुरेश कवडे, रोहिदास बेलुरे,आदि सदस्य काम करणार असल्याचे काटकर यांनी सांगितले