सोमेश्वरनगर प्रतिनिधी
अभिनय क्षेत्रात आल्यानंतर स्वत:ला सिद्ध करत असताना छत्रपती संभाजी मालिकेमुळे एक वेगळी ओळख निर्माण झाली व महाराणी येसूबाईंची भुमिका साकारत घराघरात पोहचले याचा अभिमान वाटतो अशी प्रतिक्रिया सुप्रसिद्ध युवा अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी दिली.
करंजेपुल ,ता.बारामती येथील नितीन यादव यांच्या घरी सदीच्छापर भेटीवेळी चर्चेत प्राजक्ता गायकवाड यांनी माहीती दिली.इतरांपेक्षा खुप कमी वयात मला महाराष्ट्रच नव्हे तर संपुर्ण देशात या मालिकेने ओळख दिली. ही ओळख फक्त छत्रपती संभाजी महाराज या मालिकेतुन मिळाली याचा मला निश्चित अभिमान वाटतो. पहील्यांदा मालिकेत भुमिका साकारताना मला शिवकालीन शस्त्र कला व इतर काही गोष्टी शिकताना मला हे जमेल की नाही असे वाटले परंतु शिवचरित्र व संभाजी राजांचे चरित्रचा आभ्यास करुन सगळी माहिती घेतली.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रविण गायकवाड, संभाजी ब्रिगेडचे कोषाध्यक्ष अमोल काटे, जेष्ठ पत्रकार दत्ता माळशिकारे, सोमेश्वर कारखान्याचे लेबर ॲाफीसर दीपक निंबाळकर, वाल्मिक यादव, वरुण काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.