वाल्हे प्रतिनिधी -सिकंदर नदाफ
धनगर समाज बहुउद्देशीय (धर्मादाय) विकास सेवा संस्थेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन डॉ. उज्वला ताई हाके यांनी व्यक्त केले, ......... धनगर समाज बहुउद्देशीय संस्थेची बैठक नुकतीच हडपसर येथे घेण्यात आली होती त्या प्रसंगी त्या बोलत होत्या धनगर समाज बहुउद्देशीय धर्मादाय विकास सेवा संस्थेची कार्य, ध्येय, उद्दिष्टे इतर संस्थेपेक्षा वेगळी आहेत,हि संस्था सर्व क्षेत्रात काम करणारी महाराष्ट्र राज्यातील पहिलीच संस्था असल्याचे त्यांनी सांगितले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जनतेसाठी लोकाभिमुख कामे केली आहेत त्यांनी निर्माण केलेल्या वास्तु ऐतिहासिक ठेवा म्हणुन जतन करणारी हि एकमेव संस्था असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी डॉ. उज्वला ताई हाके याची भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या वैद्यकीय आयुर्वेद आघाडीच्या संयोजिका पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा संस्थेच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिलीप काटकर, उपाध्यक्ष मच्छिंद्र पिसे, कार्याध्यक्ष बाळासाहेब डफळ, सचिव बाळासाहेब ढोरमारे, खजिनदार रमेश सावळकर, संचालक रमेश लेंडे, महादेव वाघमोडे, सुहास राहिंज, बंडोपंत नजन, रोहिदास बेलुरे जिवराज वाघमारे, धनंजय लंबाते,पोपट भांड, चंद्रशेखर सोनटक्के, सुरेश कवडे, शिवाजी काळे, बाबाराजे कोळेकर, गणेश गोरे आदि मान्यवर उपस्थित होते