बारामती प्रतिनिधी
भारतीय पत्रकार संघ बारामती तालुका यांच्या वतीने शुक्रवार दि.१९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या निमित्ताने कोऱ्हाळे बु. याठिकाणी पत्रकार संघाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या संघातही सर्व जाती- धर्मचे सदस्य व पदाधिकारी आहे असे असताना सर्व एकत्र व एकविचारची आहेत असे बोलताना संघ अध्यक्ष काशिनाथ पिंगळे म्हणाले
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून संघाची बैठक घेण्यात आली.
या बैठकीस भारतीय पत्रकार संघाचे बारामती तालुका अध्यक्ष काशिनाथ पिंगळे, उपाध्यक्ष विनोद गोलांडे, सचिव सोमनाथ लोणकर, महंमद शेख, असिफ शेख, निखिल नाटकर, राजेंद्र गोलांडे, बाळासाहेब कर्चे आदी उपस्थित होते.
या बैठकीदरम्यान नवीन पत्रकार यांचे सभासद फॉर्म भरून घेणे, संघातील सभासदांचा नवीन व्हाट्सअप ग्रुप बनवणे, तसेच उपस्थित पत्रकारांना सागर वायाळ व बाळासाहेब कर्चे यांनी प्रकाशित केलेल्या 'लॉकडाऊनचं देणं' हे पुस्तक भेट देण्यात आले.