वाल्हे प्रतिनिधी सिकंदर नदाफ
महाराष्ट्राचे कुलदैवत,तीर्थक्षेत्र जेजुरी(ता पुरंदर) येथील जेष्ठ पत्रकार तसेच अहिल्याबाई होळकर चॅरिटीज ट्रस्ट इंदोर /जेजुरीचे सह व्यवस्थापक रमेश वसंतराव लेंडे यांची भारतीय पत्रकार संघाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे .
यावेळी पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक अनिल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे विभागीय अध्यक्ष अॅड.कैलास पठारे पाटील यांनी दिलेल्या प्रस्तावानुसार ,राष्ट्रीय अध्यक्ष विक्रमजी सेन तसेच उपाध्यक्ष जयपाल पाटील यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मोहम्मद सईद शेख यांनी रमेश लेंडे यांना निवडीचे पत्र दिले आहे.
रमेश लेंडे हे पत्रकार क्षेत्रात जवळपास १५ वर्षापासून कार्यरत असून महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देव संस्थानच्या प्रसिद्धीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी कोरोना काळातही ए. आय.जे पुरंदरच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्यात आपल्या नावाचा ठसा उमटविला होता.त्यामुळे त्यांच्या निवडीबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष पदाची जवाबदारी स्विकारताना लेंडे म्हणाले भारतीय पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारांच्या अडी-अडचणी ,त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्य तथा शिक्षणा संदर्भातील समस्या सोडवण्यासह सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी सदैव प्रयत्नशील राहणार आहे.तसेच मोहम्मद सईद शेख साहेब यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे त्याला तडा जाऊ देणार नाही असेही लेंडे यांनी सांगितले .