वालचंदनगर प्रतिनिधी
विना मास्क, सोशल डिस्टन्स न पाळता जागरण गोंधळ कार्यक्रम करणा-यांना वालचंदनगर पोलीस ठाणे कडून रू.6000/- दंड वसूल...दि.1/3/2021 रोजी रात्री 2.00 ते 2.30 वाजता निमसाखर येथे रावसाहेब अण्णा चव्हाण व कळंब येथे दत्तात्रय तुकाराम वाघमोडे यांनी जागरण गोंधळ कार्यक्रम आयोजित केला होता... नाईट राऊंड दरम्यान वालचंदनगर पोलीस ठाणे येथील पोलीस उपनिरीक्षक सुभाष मुंढे यांना जागरण गोंधळ कार्यक्रमाचा स्पिकरचा आवाज येत असल्याने त्यांनी आवाजाचे दिशेने जावून चेक केले असता ... शासनाने कोरोना संसर्गाबाबत दिलेले आदेश व कायदे पायदळी तुडवून विना मास्क, सोशल डिस्टन्स न पाळता जागरण गोंधळ कार्यक्रम चालू असल्याचे दिसुन येताच पोलीस उपनिरीक्षक सुभाष मुंढे व चालक पोलीस अंमलदार शेंडकर यांनी त्यांना एकत्रित रू.6000/- चा दंड देवून समज दिली... मा.जिल्हाधिकारी यांनी जनतेच्या कोरोना पासुन संरक्षणासाठी कायदे नियम केलेले आहेत याचा कोणी भंग करत असेल तर पोलीस प्रशासनाकडून गुन्हे दाखल केले जातील.. कामाशिवाय घराबाहेर पडू नका... कोरोना पासुन सुरक्षित राहा.... मास्क वापरा....सॅनिटायझर वापरा...लाॅकडाऊन संपले आहे कोरोना संपलेला नाही तर वाढत चाललेला आहे हे नागरिकांनी लक्षात घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.