वाल्हे प्रतिनिधी : सिकंदर नदाफ
वाल्हे येथे प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या फलकाचे उद्घाटन संघटनेच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा सुरेखा ढवळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्रा.दिगंबर दुर्गाडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुरेखा ढवळे यांनी अपंग तसेच विधवा महिलांना संजय गांधी निराधार योजना,श्रावणबाळ योजना अशा विविध योजनांची माहिती देत अपंगांसाठी सोयीस्कर कक्ष स्थापन करावा अशी प्रमुख मागणी ग्रामसेवक बबनराव चखाले यांच्याकडे केली.
तर दिव्यांग ,निराधार ,असाह्य वर्गाचे हक्क ,अधिकार ,त्यांच्या अडचणी तसेच विविध मागण्या ह्या सरकार पर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही प्रा.दिगंबर दुर्गाडे यांनी दिली.
याप्रसंगी वाल्हे गावचे सरपंच अमोल खवले माजी सरपंच दत्तात्रेय पवार सत्यवान सूर्यवंशी ज्ञानेश्वर भुजबळ अनिल भुजबळ यांसह संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवाजी शिंदे, संदीप जगताप ,सचिन खवले संगीता दुर्गाडे ,मंगल पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक कुमठेकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रहार संघटनेचे वाल्हे शाखाध्यक्ष निलेश कुदळे यांनी मानले.