सोमेश्वरनगर प्रतिनिधी
दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त अनिल धुमाळ यांच्यामार्फत वडगाव बंगला ११ फाटा येथील साई समर्थ रसवंती गृहात ( ता बारामती) मोफत रस शिवभक्तांसाठी दिला जात असतो बोलताना धुमाळ म्हणाले की महाशिवरात्र ही उन्हाळ्याच्या सुरुवातीला येत असते या महिन्यात उन्हाच्या झळा शिवभक्तांना लागू नये नागरिकांना थंडावा मिळावा व दर्शन समय जाताना आयुर्वेदिक असणारा उसाचा रस शरीरात जाऊन त्यांचे आरोग्य चांगले रहावे म्हणून हा उपक्रम गेले सहा वर्ष मोफत ऊसाचा रस देऊन करत असून ते केलेल्याचे समाधान धुमाळ कुटुंबीयांनी बोलताना व्यक्त केले.