Type Here to Get Search Results !

प्रत्येकाने निसर्गाप्रती प्रेम दाखविले तर निसर्ग संवर्धनाचा उपक्रम एकत्र यशस्वी करू शकतो.

 
सोमेश्वरनगर प्रतिनिधी

 सोमवारी ८ मार्च  जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जिव्हाळा सोशल फाऊंडेशन बारामती व सोमेश्वरनगर मधील महिला भगिनींनी करंजेपूल वनक्षेत्रातील पाणवठ्यावर वन्य प्राण्यांसाठी पाण्याच्या टँकर ची सोय करून खऱ्या अर्थाने व अनोख्या पध्दतीने महिला दिन साजरा केला.
 या प्रसंगी डॉ. दर्शना  रासकर . संगिता  विधाते,जयश्री संतोष धुमाळ, प्रज्ञा बारवकर,अपर्णा प फरांदे,सुनीता फरांदे,संगिता  रासकर,प्रभावती  किर्वे, वनअधिकारी चौधरी साहेब, वनकर्मचारी नंदकुमार गायकवाड , वनपाल योगेश कोकाटे तसेच जिव्हाळा सोशल फाऊंडेशनचे सदस्य उपस्थित होते.
    प्रत्येकाने निसर्गाप्रती प्रेम दाखविले तर निसर्ग संवर्धनाचा उपक्रम एकत्र यशस्वी करू शकतो, अशी भावना जिव्हाळा सोशल फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. सर्वांनी वेळात वेळ काढून निसर्गाचे जतन करण्यास हातभार लावावा व आपल्यात दडलेला प्राणी,पक्षी व निसर्गप्रेमी जतन करावा असे आवाहनही फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test