इंदापूर तालुका प्रतिनिधी शहाजीराजे भोसले
कळंब ( ता इंदापूर ) बाबासाहेब फडतरे पाँलिटेक्निक येथे महिला दिन साजरा करण्यात आला . या कार्यक्रमासाठी कल्याणी शहाजीराजे भोसले (beauty parlourer & Makeup artist ) यांना आमंत्रित केले होते
काँलेज मधील मुली व सर्व महिला वर्गाला यावेळी मार्गदर्शन केले . त्या म्हणाल्या की आज च्या या धावपळीच्या युगात प्रत्येक स्त्रीने स्वत:साठी वेळ दिला पाहिजे,स्वत:च वेगळ अस्तित्व जपल पाहिजे तसेच झटपट मेकअप कसा करावा त्वचेची काळजी कशी घ्यायची याबाबत माहिती दिली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनाली निंबाळकर , गायकवाड मँडम, अश्विनी चव्हाण मँडम, आदींनी विशेष परिश्रम घेतले.