सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वडगांव निंबाळकर पोलिस ठाण्यात महिला दिन साजरा करण्यात आला . आरोग्य विभागाकडून डॉ बाबर आणि डॉ पंढरपुरे यांचे सहकार्य लाभले तर याप्रसंगी महिला दिनाचे अवचित्य साधून दहा फाटा येथील आरोग्य विभागातर्फे हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. वडगांव निंबाळकर ठाणे अंतर्गत महिला पोलिस पाटील उपस्थित होत्या
या कार्यक्रम वेळी वडगाव निंबाळकर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे,उपनिरीक्षक योगेश शेलार , शेख साहेब, बारामती महिला दक्षता समीतीच्या सुचित्रा साळवे, नुसरत ईनामदार,ज्योती कुटे, धारकताई त. तसेच महिला पोलिस पाटील उपस्थित होते.
यावेळी महिला दक्षता समितीच्या वतीने सुचित्रा साळवे यांनी मनोगत व्यक्त केले तर आभार ज्ञानेश्वर सानप यांनी मानले.