वाल्हे प्रतिनिधी सिकंदर नदाफ
वाल्हे येथील जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक व सामाजिक कार्यकर्ते गणपत दगडोबा गायकवाड यांचे अल्पशा आजाराने निधन झाले...... त्यांनी गोवा मुक्ती संग्रामात सक्रिय सहभाग घेतला होता.तसेच विविध सामाजिक चळवळीचे प्रणेते म्हणून त्यांची ख्याती होती. वाल्हे गावचे ते अखेरचे जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक असून त्यांच्या अचानक निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे . त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले दोन मुली दोन सुना व नातवंडे असा परिवार आहे.सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र गायकवाड व राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते संजय गायकवाड यांचे ते वडील होत.