Type Here to Get Search Results !

पुणे विभागातील 16 लाख 9 हजार 265 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले तर बाधीत रुग्णांची संख्या 16 लाख 81 हजार 681 झाली आहे : सौरभ राव

पुणे विभागातील 16 लाख 9 हजार 265 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले तर बाधीत रुग्णांची संख्या 16 लाख 81 हजार 681 झाली आहे : सौरभ राव


पुणे, दि. 25 : पुणे विभागातील 16 लाख 9 हजार 265 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 16 लाख 81 हजार 681 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 37 हजार 432 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 34 हजार 984 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.08 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.69 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 44 हजार 406 रुग्णांपैकी 10 लाख 18 हजार 8 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 8 हजार 817 आहे. कोरोनाबाधित एकूण 17 हजार 581 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.68 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.47 टक्के आहे.

सातारा जिल्हा

सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 88 हजार 769 रुग्णांपैकी 1 लाख 75 हजार 865 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 382 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 522 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 61 हजार 522 रुग्णांपैकी 1 लाख 55 हजार 125 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 36 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 361 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

  सांगली जिल्हा

सांगली  जिल्ह्यातील  कोरोना बाधीत एकूण 1 लाख 39 हजार 825 रुग्णांपैकी 1 लाख 27 हजार 313 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 544 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 968 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 47 हजार 159 रुग्णांपैकी 1 लाख 32 हजार 954 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 653 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 552 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 5 हजार 292 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 342, सातारा जिल्ह्यात 880, सोलापूर जिल्ह्यात 297, सांगली जिल्ह्यात 988 तर कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 785 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण

पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 4 हजार 113 आहे. पुणे जिल्हयामध्ये 1 हजार 86, सातारा जिल्हयामध्ये 633, सोलापूर जिल्हयामध्ये 469, सांगली जिल्हयामध्ये 772 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 1 हजार 153 रुग्णांचा समावेश आहे.

विभागातील लसीकरणाचे प्रमाण

पुणे विभागात आजपर्यंत लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 34 लाख 60 हजार 498, सातारा जिल्ह्यामध्ये 8 लाख 40 हजार 817, सोलापूर जिल्हयामध्ये 6 लाख 99 हजार 608, सांगली जिल्हयामध्ये 7 लाख 76 हजार 694 तर कोल्हापूर जिल्हयामध्ये 12 लाख 50 हजार 566 नागरिकांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 कोटी 2 लाख 41 हजार 570 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 16 लाख 81 हजार 681 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

 

(टिप :- दि. 24 जून 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)


*****

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test