Type Here to Get Search Results !

कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे मृत्यु झालेल्या कुटुंबातील व्यक्तींना महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळा मार्फत कर्ज योजना

कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे मृत्यु झालेल्या कुटुंबातील व्यक्तींना महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळा मार्फत कर्ज योजना


 पुणे दि.28: एनएसएफडीसी नवी दिल्ली यांच्या माध्यमातून महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ यांच्यामार्फत कोविड-19 या जागतिक महामारीत अनुसूचित जातीच्या कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाला आहे. त्या कुटुंबियाचे पुनर्वसन करण्यासाठी आणि Support for Marginalized Individuals for Livelihoods Enterprie (SMILE) ही व्यवसायासाठी कर्ज देण्याची योजना विचाराधीन आहे या योजनेची माहीती आणि अटी व शर्ती पुढील प्रमाणे आहे.
  ज्या प्रकल्पाचे मूल्य रुपये 1 लाख ते 5 लाखापर्यंत असेल त्यात एनएसएफडीसी सहभाग 80 टक्के, भांडवल अनुदान 20 टक्के, व्याजदर 6 टक्के, परतफेडीचा कालावधी 6 वर्षाचा असेल. या कर्ज योजनेस पुढीलप्रमाणे  पात्रता अर्जदार अनुसूचित जातीतील असावा, अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रुपये 3 लाखा पर्यंत असावे, अर्जदार हा कोरोनामुळे मृत्यु पावलेल्या कुटुंब प्रमुखाच्या कुटुंबातील सदस्य असावा (कुटुंब प्रमुखाच्या रेशनकार्डवर सदर सदस्याचे नाव असणे बंधनकारक),मृत्यु पावलेल्या व्यक्तींची वयोमर्यादा 18 ते 60 च्या दरम्यान असावी. मृत्यु पावलेल्या कुटुंब प्रमुखाची मिळकत कुटुंबाच्या एकूण मिळकतीपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. कोरोनामुळे मृत्यु पावलेल्या व्यक्तीकरिता पुढील पैकी एक दस्तावेज आवश्यक आहेत, अ) महानगर पालिका/नगरपालिका यांनी दिलेले मृत्यु प्रमाणपत्र (आ) स्मशानभूमी प्राधिकारणाने दिलेली पावती. इ) एखादया गावात स्मशानभूमी नसल्यास गट विकास अधिकाऱ्याने दिलेले मृत्यु प्रमाणपत्र. 
  आवश्यक कागदपत्रे : मयत व्यक्तीचे नाव पत्ता, आधारकार्ड, उत्पनाचा दाखला (3 लाखा पर्यंत), कोविड-19 मुळे मरण पावलेल्या व्यक्तीचा मृत्युचा दाखला, रेशन कार्ड, वयाचा पुरावा अशी आहेत.
  कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे मृत्यु झालेल्या कुटुंबातील व्यक्तीने उपरोक्त वरील माहिती महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात अथवा या लिंकवर 

https://forms,gle/7mG8CMecLknWGt6k7 

वर भरण्यात यावी, अशी माहिती महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक पुणे यांनी कळविली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test