कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत होळ व सोरटेवाडी येथे मार्गदर्शन
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत दिनांक २१ जून १ जुलै या कालावधीमध्ये 'कृषी संजीवनी मोहीम "राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यभर प्रत्येक दिवशी एका विषयावर शेतकऱ्यांना शेती विषयक मार्गदर्शन, प्रात्यक्षिक, शिवार फेरी, इ. च्या माध्य मातून कृषी तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसिद्धी करण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत दिनांक २५ जून रोजी सोरटेवाडी, होळ चीन आधारकर संशोधन संस्था येथे मंडल कृषी अधिकारी वडगाव निबाळकर कार्यालयाच्या वतीने.'विकेल ते पिकेल' या अभियानांतर्गत नाविन्यपूर्ण पीक पद्धतीमध्ये खपली गहू लागवड याविषयी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास कृषी आयुक्तालय कार्यालयातील कृषी उपसंचाल ऊर्मिला रजपूत , नोडल ऑफिसर म्हनून उपस्थित होत्या, तसेच उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे, बारामती तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ, सोमेश्वर साखर कारखान्याचे मा.उपाध्यक्ष सिद्धार्थ गीते, होळचे सरपंच संतोष होळकर,सोरटेवाडीचे सरपंच दत्तात्रय शेंडकर, उपसरपंच विकास पवार व प्रगतशील शेतकरी श्रीपाल सोरटे इत्यादी शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी आधारकर संशोधन संस्थे डॉक्टर विजेंद्र बावस्कर यांनी खपली गहू भागबड तंत्रज्ञान व आहारातील महल या विषयावर मार्गदर्शन केले व भानुदास एंटोन यांनी सोयाबीन लागवड तंत्रज्ञान तर
डॉक्टर सुधीर नवाये यांनी आगरकर संशोधन संस्थेच्या कार्याविषयी माहितीबदिली. तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांनी तालुक्यामध्ये राबवण्यात येत असलेल्या कृषी संजीवनी मोहिमे " या उदेश, नाविन्यपूर्ण योजना, महाडीबीटी इत्यादी बाबत मार्गदर्शन केले. उपविभागीय अधिकारी बालाजी ताटे यांनी "विकेल ते पिकल' नाविन्यपूर्ण बाबी पीक पद्धती बाबत मार्गदर्शन केले.तसेच लागवडीपासून ते पावणीपर्पत तसेच विक्री व्यवस्थापन यावर शासनस्तरावरून
सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
कृषी उपसंचालक उर्मिला राजपूत यांनी तालुक्यात राबवल्या जात असलेल्या कृषी संजीवनी मोहिमेबाबत समाधान व्यक्त केले. कृषी विभागाच्या वतीने एकामिक फलोत्पादन योजने अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास सोरटेवाडी परिसरातील शेतकरी कृषी विभागाचे संशोधन संस्थेचे कर्मचारी उपस्थित होतेबकार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी पर्यवेक्षक चंद्रशेखर जगताप यांनी केले तर आभार कृषी पर्यवेक्षक प्रवीण माने यांनी मानले.