Type Here to Get Search Results !

पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना मृग बहार सन 2021, शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना मृग बहार सन 2021, शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन
पुणे,  

पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना मृग बहार सन 2021 मध्ये डाळिंब, संत्रा, मोसंबी, चिकू, पेरु, लिंबू, सिताफळ व द्राक्ष (क) या आठ फळ पिकासाठी 26 जिल्ह्यामध्ये फळपिकांच्या हवामान धोक्यांच्या निकषानुसार राबविण्यात येत आहे, या योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी ऐच्छिक आहे. योजनेत सहभागी होणे बाबत अथवा न होणेबाबत घोषणपत्र ज्या बँकेमध्ये पिककर्ज खाते, किसान क्रेडिट कार्ड खाते आहे तिथे जमा करणे आवश्यक आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होण्याबाबत घोषणापत्र योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या 7 दिवस अगोदर बँकेला देणे आवश्यक आहे. जेणेकरुन बँक विमा हप्ता परस्पर कपात करणार नाही. तसेच कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्यासाठी कर्ज घेतलेल्या अधिसूचित फळपिकांकरिता विहित नमुन्यातील घोषणापत्र संबंधित बँकेत सादर करणे आवश्यक राहिल. जे कर्जदार शेतकरी विहित मुदतीत सहभागी न होण्यासाठी बॅंकांना कळविणार नाहीत असे शेतकरी योजनेत सहभागी आहेत असे गृहित धरण्यात येईल व या शेतकऱ्यांचा विमा हप्ता विहित पद्धतीने कर्ज खात्यातुन वजा करण्यात येईल. 
अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळपिके घेणारे (कुळाने / भाडे पट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी) या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. जमीन भूधारणेच्या मर्यादेत एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकासाठी 4 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करण्याची मुभा आहे. केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे. यापेक्षा कमी वयाच्या फळबागा लागवडीस विमा संरक्षणाची नोंद झाल्याचे पडताळणीत निदर्शनास आल्यास विमा संरक्षण संपुष्टात येईल. ही योजना सन 2021 मृग बहार मध्ये 5 जिल्हा समुहांसाठी ३ विमा कंपन्यांमार्फत राज्यात राबविण्यात येत आहे.            शेतकऱ्यांनी (कर्जदार व बिगर कर्जदार) योजनेतील सहभागाचा अर्ज सादर करणे, विमा हप्त्याची रक्कम कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामधून प्राथमिक सहकारी संस्था /बँक/आपले सरकार सेवा केंद्र/ विमा प्रतिनिधी यांनी कपात करणे/ शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक पुढीलप्रमाणे आहे. संत्रा, मोसंबी, चिकू, पेरु, लिंबू, द्राक्ष (क) - 30 जून २०२१, डाळिंब - १४ जुलै २०२१ व सिताफळ - ३१ जुलै २०२१.
मृग बहार सन 2021 या वर्षासाठी अधिसूचित फळ पिके, समाविष्ट हवामान धोके व विमा संरक्षण कालावधी निर्धारित करण्यात आला असून निर्धारीत केलेले हवामान धोके (Weather Triggers) लागू झाल्यास विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई विमा कंपनी मार्फत देय होणार आहे. मृग बहारातील फळपिकांच्या विमा नोंदणी करीता राष्ट्रीय पिक विमा पोर्टल सुरु करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी अधिसुचित फळपिकांच्या हवामान धोक्यांची माहिती करुन घेऊन विहित मुदतीमध्ये नजिकच्या ई-सेवा केंद्र किंवा बँक / वित्तीय संस्था यांच्याशी संपर्क साधून सहभाग नोंदवावा, असे आवाहन कृषी विभागा मार्फत करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावयाचा आहे. मृग बहारातील अधिसुचित फळपिकांच्या हवामान धोक्यांच्या सविस्तर माहितीसाठी कृषी विभागाचे संकेतस्थळ - www.krishi.maharashtra.gov.in पाहता येईल. तसेच ई - सेवा केंद्र व बँक स्तरावरही याबाबतची माहिती उपलब्ध करुन देण्याच्या सुचना कृषी विभागाने सहभागी विमा कंपन्यांना दिल्या आहेत. सहभागी सर्व विमा कंपन्यांनी त्यांचेकडील जिल्हा व तालुका स्तरावर नियुक्त केलेल्या प्रतिनिधींची नावे मोबाईल क्रमांकासह कृषि विभागाच्या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात आल्याचेही कृषी विभागाने दिलेल्या प्रसिदधी पत्रका म्हटले आहे.
जिल्हा समूह क्र. जिल्हे विमा कंपनीचे नांव व पत्ता
१ अहमदनगर, अमरावती, सिंधुदुर्ग, नाशिक, वाशिम, यवतमाळ रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि. 
ग्राहक सेवा क्र. : 18001024088 - दूरध्वनी क्र. 022 - 68623005.
ई-मेल:- rgicl.maharashtraagri@relianceada.com 
2 बीड, औरंगाबाद, अकोला, सांगली, वर्धा, ठाणे, हिंगोली. एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कं. लि. 
ग्राहक सेवा क्र. : 18002660700, दूरध्वनी क्र. 022-62346234
ई-मेल:-  pmfby.maharashtra@hdfcergo.com
३ सातारा, परभणी, जालना, लातुर, कोल्हापूर
४ रायगड, बुलढाणा, जळगाव, नांदेड, पुणे, उस्मानाबाद भारतीय कृषि विमा कंपनी लिमिटेड 
टोल फ्री क्र. : 18004195004, दूरध्वनी क्र. 022 - 61710912
ई-मेल - pikvima@aicofindia.com  
५ धुळे, पालघर, सोलापुर, रत्नागिरी, नागपूर, नंदुरबार रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि. 
ग्राहक सेवा क्र. : 18001024088, दूरध्वनी क्र. 022 - 68623005.
ई-मेल:- rgicl.maharashtraagri@relianceada.com

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test