Type Here to Get Search Results !

रंगीत छायाचित्र नसल्यास मतदारांची नावे वगळणार नावे तपासून घेण्याचे प्रशासनाचे आवाहन...

रंगीत छायाचित्र नसल्यास मतदारांची नावे वगळणार नावे तपासून घेण्याचे प्रशासनाचे आवाहन...


पुणे, 

 विधानसभा मतदार संघात ज्या मतदारांची रंगीत छायाचित्रे मतदार यादीत नाहीत अशा मतदारांनी आपले रंगीत छायाचित्र निवडणक शाखा तहसिल कार्यालय हवेली खडकमाळ आळी, शुक्रवार पेठ, पुणे -2 येथे आठ दिवसांच्या आत जमा करावेत, असे आवाहन हवेली प्रांत अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी सचिन बारवकर व तहसिलदार तृप्ती कोलते-पाटील  हवेली यांनी केले आहे.
आजपासून 8 दिवसांच्या आत ज्या मतदारांच्या मतदार यादीमध्ये छायाचित्र नसेल अशा मतदारांनी आपले दोन पासपोर्ट रंगीत छायाचित्रासह आधारकार्डची छायांकित प्रत, वीज देयकाची छायांकित प्रत तहसिल कार्यालय हवेली निवडणुक शाखा येथे किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे कागदपत्रे जमा करावेत. 
ज्या मतदारांची नावे दुबार झाली आहेत, त्यांनी त्यांचे नाव वगळण्याबाबत नमुना नं. 7 चा फॉर्म भरणे तसेच स्थलांतर झालेले, दुबार, मयत, नवीन मतदार इत्यादींची कामे केली जात आहेत. तसेच यादीत नाव असूनही छायाचित्र नसणे, पुर्ण माहिती नसणे, तसेच पत्ता अद्ययावत करणे इत्यादीबाबत कागदपत्रे कार्यालयात जमा करावेत अथवा  www.nvsp.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज नमुना नं. 8 भरावेत. ज्या मतदारांचे छायाचित्र आठ दिवसात जमा होणार नाहीत अथवा www.nvsp.in यावर ऑनलाईन अर्ज नमुना 8 मध्ये प्राप्त होणार नाहीत अशा मतदारांची नावे मतदार यादीतुन वगळणेबाबत पुढील योग्य ती कार्यवाही करणेत येईल.
मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. नागरिकांनी मतदार यादीतील त्यांची नावे तपासून घ्यावीत. छायाचित्र आहे किंवा नाही, याची पाहणी करावी. छायाचित्र नसल्यास कागदपत्र त्वरीत सादर करावीत, तहसिलदार हवेली तथा 211 खडकवासला मतदार संघाचे  सहा. मतदार नोंदणी अधिकारी तृप्ती कोलते यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
****

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test