Type Here to Get Search Results !

पोलिस महिलेचा विनयभंग अन मारहाण; अश्लील बोलणार्या सहाय्यक फौजदार अन..3 महिला पोलिसांवर गुन्हा.

पोलिस महिलेचा विनयभंग अन मारहाण; अश्लील बोलणार्या सहाय्यक फौजदार अन..3 महिला पोलिसांवर गुन्हा.


पुणे:- पुण्यातील शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व तीन महिला पोलीस कर्मचाऱ्यांविरूध्द महिला
कर्मचार्याचा विनयभंग आणि मारहाण केल्याचा
गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे पुणे पोलिस  दलामध्ये प्रचंड खळबळ उडाली याप्रकरणी एका 35 वर्षीय पोलीस महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.त्यानुसार रत्नकांत गणपतराव इंगळे (वय 54)यांच्यासह तीन महिला कर्मचाऱ्यांवर IPC कलम 354 (ड), 193, 201, 323 341, 427, 448,504, 506, 509 नुसार गुन्हा नोंद केला आहे.हा सर्व प्रकार जून 2020 ते जून 2021 या कालावधीत घडला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पुणे पोलीस दलात पोलीस शिपाई आहेत.
त्यांचीनेमणूक शिवाजीनगर मुख्यालयात आहे.
सहाय्यक उपनिरीक्षक रत्नकांत इंगळे हे
मुख्यालयात लाईन डफेदार आहेत तर इतर 3
महिला पोलीस देखील मुख्यालयात कार्यरत
आहेत. दरम्यान, फिर्यादी यांच्याबाबत या तीन महिला कर्मचारी यांनी लाईन डफेदार यांच्याकडे तक्रार अर्ज केले होते. त्याबाबत त्यांनी फिर्यादी यांना फोन करून विचारपूस केली. मात्र, यावेळी त्यांनी अश्लील बोलत विनयभंग केला असे
तक्रारीत म्हंटले आहे. तर फिर्यादी यांना इतर
तीन महिलांनी त्यांना सार्वजनिक टॉयलेटला
जातेवेळी अडविले. त्यांना जाऊ दिले नाही. त्या
घरी गेल्यानंतर पुन्हा तीन महिला फिर्यादी यांच्या
घरात शिरल्या व त्यांनी फिर्यादी यांचा फोन
आणि इतर वस्तू आपटून फोडल्या. तर त्यांनी
केलेला अर्ज मागे घ्यावा यासाठी अश्लील
शिवीगाळ करत त्यांना मारहाण केली असल्याचे
म्हंटले आहे. फिर्यादी यांनी याबाबत न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने 156/3 नुसार पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार चौकशी करून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिवाजीनगर अधिक तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test