'जैविक खते व ऊस शेती' ही काळाची गरज
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
जैविक खते व ऊस शेती या विषयावर प्रणाली शिक्षण संस्था करंजे ता बारामती जि पुणे व सेवाभावी संस्था सोमेश्वर पंचक्रोशी यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक १८ जून २०२१ रोजी संस्थेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आला. यावेळी वडगाव मंडळचे कृषी सहायक मा.श्री. शरद सावंत साहेबांनी बेणे प्रक्रिया, प्रकाश सापळा, गांडूळ खत अशा विविध विषयांवर चर्चा करून मार्गदर्शन केले. यावेळी केरन या जैविक खते उत्पादन व वितरण कंपनीचे मा. श्री. सचिन कोंडे देशमुख व मा.श्री. विशाल देशमुख यांनी जमिनीची सुपीकता टिकून राहण्यासाठी जैविक खतांची माहिती दिली. जैविक खते वापरली तर उत्पादन जवळपास ३०% कसे वाढते यासंदर्भात व्हिडिओ द्वारे समजावून सांगितले. पारंपरिक रासायनिक खतांच्या अति वापरामुळे जमिनीचा कस कमी होत चालला आहे त्याचा परिणाम उत्पादनावर होतो आहे. रासायनिक खतांचा वापर हळूहळू कमी करुन जैविक खते वापरली तर जमीन उत्पादनास योग्य होईल. यावेळी परिसरातील शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांना मार्गदर्शन होतील असे परिसंवाद आयोजित करणे ही काळाची गरज आहे. शेती हा व्यवसाय समजून तो आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर शेतकरी सुखी होईल
जैविक खते व त्यांचा वापर या विषयावर मा. श्री. सचिन कोंडे सर वडगाव मंडळ चे कृषी सहाय्यक श्री.शरद सावंत विशाल देशमुख या मान्यवरांनी सर्व शेतकरी बांधवांना मोलाचे मार्गदर्शन केले.