Type Here to Get Search Results !

लोणंद पोलिसांनी खुनाचे गुढ उघडले...

लोणंद पोलिसांनी खुनाचे गुढ उघडले...

खंडाळा गावचे हद्दीतील निरा उजवा कॅनॉलमध्ये दि ०८ रोजी अनोळखी इसमाचे प्रेत मिळुन आल्यावरून लोणंद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली होती. तपासांती हा खून असल्याचे उघड करून आरोपीपैकी एकास ताब्यात घेण्यास लोणंद पोलिसांना यश मिळाले आहे.

वाठार काॅलिनी जवळ निरा उजव्या कालव्यात आढळून आलेल्या अनोळखी मृत इसमाची ओळख त्याच दिवशी पटवण्यात लोणंद पोलीस यशस्वी झाले होते. सदर झालेल्या खुनाच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलिस अधिक्षक अजयकुमार बंसल , अपर पोलीस अधीक्षक , धिरज पाटील , व उपविभागीय पोलीस अधिकारी ,तानाजी बरडे यांनी तपासाबाबत योग्य त्या सुचना दिल्या . गुन्हयाचा तपास चालु असताना उपविभागीय पोलीस अधिकारी  तानाजी बरडे , सपोनि विशाल वायकर , गुन्हे प्रकटीकरण विभाग लोणंद यांनी तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे आरोपीची नावे निष्पन्न करुन संशयीत आरोपी वैभव सुभाष जगताप वय २८ वर्षे रा.पांगारे ता.पुरंदर जि.पुणे हा पोलिसांची चाहूल लागताच मोटारसायकलवर बसून आडरानात पळून जात असतानाच त्याला फिल्मी स्टाईलने पाठलाग करून पकडले. त्याच्याकडे विचारपुस केली असता उडवाउडविची उत्तरे देवुन पोलीसांची दिशाभुल करण्याचा प्रयत्न करु लागला. परंतु इंट्रोगेशन स्किलचा वापर करुन उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी आरोपींनी सदरचा खुन कसा व कोठे केला हे निष्पन्न केले.

सदर गुन्हाचे तपासामध्ये आरोपी वैभव जगताप , त्याचा साथीदार ऋषिकेश पायगुडे व मयत हे येरवडा जेल येथे शिक्षा भोगत असताना झालेल्या वादावरुन खुन केल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर गुन्हातील आरोपींनी यापूर्वी खुनाचे गुन्ह्यात येरवडा जेल मध्ये शिक्षा भोगली आहे . सदर क्लिष्ट स्वरुपाचा खुनाचा गंभीर गुन्हा हा कोणताही स्वरुपाचा आरोपी पर्यंत पोहचण्याचा धागादोरा नसताना लोणंद पोलीसांनी उघडकिस आणला आहे . सदर संशयीतास खुनाच्या गुन्हयात अटक करण्यात आली असून या गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोत्नीस निरीक्षक विशाल के . वायकर हे करीत आहेत .

या प्रकरणात अजयकुमार बंसल पोलीस अधिक्षक सातारा , धिरज पाटील अप्पर पोलीस अधिक्षक , सातारा यांचे सुचनेप्रमाणे तसेच तानाजी बरडे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण विभाग यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल के , वायकर , पोलीस उपनिरीक्षक गणेश माने , सहा.फौजदार शौकत सिकिलकर , देवेंद्र पाडवी , पो.अंमलदार महेश सपकाळ , अंकुश इवरे , अविनाश नलवडे , संतोष नाळे , ज्ञानेश्वर मुळीक , श्रीनाथ कदम , अभिजीत घनवट , सागर धेंडे , अविनाश शिंदे , विठ्ठल काळे , फैयाज शेख , अमोल पवार , शशिकांत गार्डी , गोविंद आंधळे , केतन लाळगे , महीला पोलीस अंमलदार प्रिया दुरगुडे चालक मल्हारी भिसे , शिंदे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test