अभिजित डाळींबे यांची संजय गांधी निराधार योजनेच्या समितीच्या सदस्यपदी निवड
देऊळगाव राजे प्रतिनिधी
शिरापुर (ता. दौंड)येथील अभिजीत प्रकाश डाळींबे यांची नुकतीच जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार संजय गांधी निराधार योजना समितीच्या सदस्यपदी नुकतीच निवड करण्यात आली या निवडीचे पत्र निकतेच दौंड चे तहसीलदार संजय पाटील यांनी डाळींबे यांना दिले.संजय गांधी निराधार अनुदान योजना ,श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना,इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी अपंग निवृत्ती वेतन योजना, केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना ,या सर्व योजना लाभार्थी यांना वळोवेळी पुढाकार घेऊन जास्ती जास्त लाभ पुढील काळात मिळवून दिला जाईल असे डाळींबे यांनी निवडीनंतर सांगितले.