बारामती,इंदापूर,दौंड ९०५ रिक्षा चालकांना अनुदान प्राप्त तर उर्वरीत २७७ नी कागदपत्रांची पूर्तता करावी
बारामती प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षाचालकांना राज्य शासनाने सानुग्रह अनुदान म्हणून १५०० रुपये अर्थसहाय्य देण्याबाबत घोषणा केली आहे. त्यानुसार बारामती उपप्रादेशक परिवहन कार्यालयाच्या अंतर्गत असणाऱ्या बारामती, इंदापूर, दौंड येथील ९०५ रिक्षाचालकांना अनुदान प्राप्त होण्याची करवाई पूर्ण झाली आहे.
बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अखत्यारीत १८२९ रिक्षाचालक असून, आतापर्यंत १०१४ अर्ज प्राप्त झाले आहेत.त्यापैकी ९०५ रिक्षा चालकांच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली असल्याने त्यांच्या बँक खात्यावर १५०० अनुदान पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.तर २७७ रिक्षाचालकांच्या अपूर्ण कागदपत्रांची पूर्तता अद्याप पर्यंत झाली नाही. उर्वरित रिक्षाचालकांना अनुदान मिळण्यासाठी लवकरात लवकर कागदपत्रांची पूर्तता करण्याचेे आव्हान बारामतीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर पाटील व राजेंद्र केसकर यांनी केले आहे.