Type Here to Get Search Results !

मास्क (मुखपट्टी)धारी चोर पोलिसांसाठी डोकेदुखी,सी.सी.टी.व्ही.त चित्रित होऊनही सोनसाखळी चोर पकडताना अडचणी.

मास्क (मुखपट्टी)धारी चोर पोलिसांसाठी डोकेदुखी,
सी.सी.टी.व्ही.त चित्रित होऊनही सोनसाखळी चोर पकडताना अडचणी.
करोना साथ काळात मास्क (मुखपट्टी) वापरास अन्यन्यमहत्त्व प्राप्त झाले आहे. 
त्यामुळे मास्क (मुखपट्टी) न वापरणाऱ्या नागरिकांकडून स्थानिक स्वराज्य संस्था लाखो रुपये दंड वसूल करीत असून मास्क (मुखपट्टी) हे एक करोनापासून संरक्षण मिळवण्याचे प्रमुख साधन मानले गेले आहे. 
मात्र या मास्क (मुखपट्टी)मुळे पोलिसांना एक नवीन डोकेदुखी निर्माण झाली असून टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर सोनसाखळी लंपास करणे आणि घरफोडी या दोन गुन्ह्यांत शहरी भागात वाढ झाली आहे.
 यात मास्क (मुखपट्टी) आणि टोपी वापरून सोनसाखळी चोरणाऱ्या टोळ्या कार्यरत आहे. 
यामुळे घटना घडलेल्या ठिकाणी असलेल्या सी.सी.टी.व्ही. कॅमेरात चोरांची छबी उमटूनही त्यांना पकडणे कठीण झाले आहे. 
चोरी, घरफोडी करणाऱ्यांकडून चोरी करताना आता मास्क (मुखपट्टी)चा वापर केला जात आहे. 
यापूर्वी सोनसाखळी चोरांची ओळख पटणे पोलिसांनी सोयीचे जात होते. 
मात्र गेल्या वर्षीपासून सुरू झालेल्या करोना साथीनंतर सरकारने घराबाहेर पडताना मास्क (मुखपट्टी) वापरणे सक्तीचे केले.
 त्याचा गैरफायदा चोरांकडून घेतला जात आहे. 
पोलिसांच्या दृष्टीने ही डोकेदुखी ठरली आहे. 
गेल्या वर्षी मार्चनंतर सोनसाखळी चोरीच्या १८५ तर घरफोडीच्या ६८ घटना घडलेल्या आहेत.
 यात पनवेल तालुक्यात ५५ घटनांची नोंद आहे. 
या वर्षांच्या २५ घटनांतील १४ घटनांचा तपास पोलीस लावू शकलेले आहेत. 
त्यासाठी सोनसाखळीसाठी वापण्यात येणाऱ्या वाहनांचा मागोवा घेऊन हा तपास पूर्ण करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 
     सरकारच्या मास्क (मुखपट्टी) वापराच्या बंधनामुळे गुन्हेगाराला मात्र या चांगली संधी मिळाली असून मास्क (मुखपट्टी)चा असाही एक दुरुपयोग केला जात आहे.
मास्क ( मुखपट्टी)च्या वापरामुळे करोनापासून संरक्षण मिळत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test