श्रीमती राजश्री नरसिंगराव पिसाळ (देशमुख) यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी निधन.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
श्रीमती राजश्री नरसिंगराव पिसाळ (देशमुख) यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी ओझर्डे ता.वाई येथील रहात्या घरी ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने गुरूवार दि २४ जून २०२१ रोजी पहाटे दु:खद निधन झाले.
त्या सकाळ वृत्तसमूहाचे सीओओ व श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराचे विश्वस्त श्री महेंद्र नरसिंगराव पिसाळ देशमुख यांच्या मातोश्री होत.