Type Here to Get Search Results !

त्या...जिल्ह्यांना मुसळधार पाउस असल्याचा इशारा, तर हवामान खात्याकडून रेड अलर्ट

त्या...जिल्ह्यांना मुसळधार पाउस असल्याचा इशारा, तर हवामान खात्याकडून रेड अलर्ट


जून महिन्यात सुरू होणाऱ्या मान्सूनचं आगमन झाल्यापासून  आठवडाभर मुसळधार पाऊस सुरू आहे. मान्सूनचं वेळेत दाखल झाल्यामुळे एकीकडे बळीराजा सुखावला असला तरी अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली असून काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात घरांमध्ये आणि दुकांनामध्ये पाणी शिरलं आहे. अशात आता मुंबईला पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा , कोकण आणि विदर्भातही सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. अधिक माहितीनुसार, मुंबईसह सांताक्रूझ, विरार, पालघर डहाणू, बोरीवाली, कल्याण, पनवेल, अलिबाग, खंडाळा घाट यांसह अनेक उपनगरांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील तीन ते चार दिवस राज्यात धुवांधार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

विदर्भातही अकोला, बुलडाणा, वाशिम, अमरावती आणि नागपूरमध्ये मुसळधार पाऊस असा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. इतकंच नाहीतर तर गरज नसल्याच घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test