Type Here to Get Search Results !

बारामतीतील चौधरवाडी येथे शेतकरी गटाला कृषी विभागामार्फत बाजरी बियाणे वाटप.

Top Post Ad

बारामतीतील चौधरवाडी येथे शेतकरी गटाला  कृषी विभागामार्फत बाजरी बियाणे वाटप.

फोटोओळी :  चौधरवाडी शेतकऱ्यांना बाजरी बियाणे वाटप करताना प्रगतशील शेतकरी सुखदेव शिंदे  व इतर

सोमेश्वरनगर प्रतिनिधी 

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत  चौधरवाडी (ता बारामती) येथे राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान सन २०२१-२२ पौष्टीक तृणधान्य- बाजरी पीक प्रात्यक्षिकाचे बियाणे प्रगतशील शेतकरी सुखदेव शिंदे, प्रदीप भापकर  यांचे हस्ते शेतकऱ्यांना बांधावर वाटप करण्यात आले.   

महाडीबीटी मधून अर्ज केलेल्या शेतकरी गटास १० हेक्टर बाजरी पेरणीसाठी २५ शेतकऱ्यांना प्रत्येकी १ एकरसाठी दीड किलो बियाणे वाटप करण्यात आले. 
    बारामती तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ,  मंडल कृषी अधिकारी दीपक गरगडे व कृषी प्रवेक्षक चंद्रशेखर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करजेचे  कृषी सहायक   शरद सावंत यांनी  हा कार्यक्रम राबविण्यात आला.
        
बीबीएफ यंत्राद्वारे बाजरीची पेरणी करावी, त्यासोबत बीबीएफ यंत्राने खत टाकल्यास १० टक्के रासायनिक खताची बचत होते.बाजरीचे बीज  प्रात्यक्षिक करून दाखवत,योग्य प्रमाणात बी व खत पडून ठराविक अंतरावर बाजरी पेरल्यामुळे उगवणक्षमता चांगली होते आणि उत्पादन क्षमतेतही वाढ होते. यावेळी बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक व बाजरी लागवड तंत्रज्ञान याविषयी कृषी सहाय्यक सावंत यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
       यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रदीप भापकर, तानाजी भापकर, निलेश भापकर, ऋषिकेश पवार उपस्थित होते.


Below Post Ad

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.