भारतीय जनता पार्टी चे वासुदेव काळे यांची किसान मोर्चाच्या प्रदेशाअध्यक्ष पदी निवड.
देऊळगावराजे प्रतिनिधी
शिरापूर ग्रामस्थांना कडून वासुदेव काळे यांच्या नागरी सत्कार करण्यात आला
शिरापूर(ता. दौंड )येथील भारतीय जनता पार्टी चे जेष्ठ नेते वासुदेव काळे यांची नुकतीच किसान मोर्चाच्या प्रदेशाअध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे,या निवडीबद्दल नुकताच शिरापूर ग्रामस्थांतर्फे काळे यांचा नागरी सत्कार करण्यात आला, या वेळी काळे म्हणाले की मिळालेले पद फक्त नावापुरते नसून या पदाचा जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांना मिळवून देणार आहे, आजपर्यंत केलेल्या प्रामाणिक कामाची पक्षाने पावती दिली असून ,या पुढील काळात देखील प्रामाणिक काम करणार असल्याचे काळे यांनी सांगितले, निवड होऊन अवघे पंधरा दिवस झाले असून या अल्प कालावधीत तीन आंदोलन केले असून पीक विमा कंपनीच्या आंदोलनाला चांगले यश मिळाले असल्याचे काळे यांनी सांगितले. या वेळी दौंडचे माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, डी. के. खळदकर, कानिफ सूर्यवंशी, अशोक कापसे, केशव काळे, शहाजी काळे, प्रवीण कापसे,राजेंद्र जगताप आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी माजी जि. प.सदस्या माधुरी काळे, स्वामी चिंचोलीचे माजी सरपंच अजरुद्दीन शेख, मदन गोडसे, सरपंच सुनंदा फाळके, उपसरपंच प्रवीण सातव, प्रशांत साळुंखे,राजेंद्र काटकर,सुधीर फाळके,विनय पानवकर ,प्रशांत खुडे आदी मान्यवर आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.