तालुकास्तरीय सार्वजनिक वितरण व्यवस्था व दक्षता समितीच्या सदस्यपदी सुचिता साळवे यांची निवड.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील तालुकास्तरीय सार्वजनिक वितरण व्यवस्था व दक्षता समितीच्या सदस्यपदी वाघळवाडी-सोमेश्वरनगर च्या सुचिता जगन्नाथ साळवे यांची सदस्यपदी तहसीलदार विजय पाटील यांनी नुकतीच निवडीचे पत्र दिले. यावेळी पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य प्रमोद जाधव उपस्थित होते...
बारामती तालुक्यात सुचिता साळवे या महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस आणि विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. तर ही निवड आत्तापर्यंत केलेल्या तालुकास्तरीय विविध सामाजिक कामाची पावती आहे असे बोलताना साळवे यांनी सांगितले.
या निवडीबद्दल सोमेश्वरनगर परिसरातील सर्वच गावांमधील प्रतिष्ठित मान्यवर ग्रामस्थांनी शुभेच्छाचा वर्षाव करत अभिनंदन केले पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.