शिवरी येथे "आपले सरकार सेवा केंद्र"चा शुभारंभ.
पुरंदर प्रतिनिधी.
पुरंदर तालुक्यातील शिवरी मध्ये "आपले सरकार सेवा केंद्र" सुरू करण्यात आले.हे केंद्र सुरू झाले असल्याने शिवरी पंचक्रोशीतील असणाऱ्या गावांमधील नागरिकांना महत्वाची सुविधा मिळण्यास मदत होणार असल्याने समाधान व्यक्त केले या केंद्राचे उद्घाटन 'बहुजन हक्क परिषदे' चे संस्थापक - अध्यक्ष सुनील तात्या धिवार यांच्या शुभहस्ते सोमवार दि 28 रोजी करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी उद्योजक सुभाष अण्णा सूर्यवंशी शिवरी गावचे सरपंच प्रमोद जगताप, ग्रा. सदस्य राजू क्षिरसागर , पत्रकार संतोष डुबल तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी शिवरीतील "आपले सरकार सेवा केंद्र" ला पुढील वाटचालीत शुभेच्छा देत अभिनंदन केले.